पंढरपुरात 'आणि ते मंगल झाले' पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याच्या आयोजन

पंढरपुरात 'आणि ते मंगल झाले' पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याच्या आयोजन

पंढरपुरात 'आणि ते मंगल झाले' पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याच्या आयोजन

पंढरपुरात 'आणि ते मंगल झाले' पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याच्या आयोजन

पंढरपूर,(दि-०२):- पंढरीतील पालवी संस्थेच्या संस्थापिका व असंख्य एडसग्रस्त बालकांचे जीवन उजळून टाकणाऱ्या मंगलताई शहा यांच्या प्रेरणादायी जीवन प्रवासावर आधारित 'आणि ते मंगल झाले' या जोहडाकार सुरेखा शहा लिखित पुस्तकाचा प्रकाशन सोहळा गुरुवार दिनांक 2 फेब्रुवारी 2023 रोजी सायंकाळी 4.30 वाजता कर्मयोगी सभागृहांमध्ये आयोजित केला आहे.
      या प्रकाशन सोहळ्यामध्ये माजी आमदार प्रशांत परिचारक, भागवताचार्य व ज्येष्ठ पत्रकार बाळासाहेब बडवे, ह. भ .प डॉ.जयवंत महाराज बोधले व साहित्यिका सुरेखा शहा या मान्यवरांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे. तरी पंढरपूर परिसरातील नागरिकांनी पंढरपूर अर्बन बँकेच्या खवा बाजार येथील कर्मयोगी सभागृहामध्ये गुरुवारी सायंकाळी 4.30 वाजता आवर्जून उपस्थित रहावे, असे आवाहन पालवी संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.