पंढरपूर तालुक्यातील दहा ग्रामपंचायत मध्ये दुपारपर्यंत किती टक्के मतदान झाले पहा

पंढरपूर तालुक्यातील दहा ग्रामपंचायत मध्ये दुपारपर्यंत किती टक्के मतदान झाले पहा

पंढरपूर तालुक्यातील दहा ग्रामपंचायत मध्ये दुपारपर्यंत किती टक्के मतदान झाले पहा

पंढरपूर रविवार दिनांक 18 डिसेंबर सोलापूर जिल्ह्यातील ग्रामपंचायत 189 ग्रामपंचायतची ग्रामपंचायत पैकी पंढरपूर तालुक्यातील एक ग्रामपंचायत अगोदरच बिनविरोध झाले आहे. उर्वरित पंढरपूर तालुक्यातील दहा ग्रामपंचायती तुंगत मेंढापूर पुळुजवाडी खरातवाडी होळे खेड भोसे बार्डी अजोती टाकळी (गुरसाळे) नेमतवाडी या दहा गावामध्ये आज रविवार दिनांक १८/१२/२०२२रोजी सकाळी ७/३० मतदान सुरू झाले आहे. महसूल प्रशासन निवडणूक निर्णय अधिकारी हे सकाळ पासून प्रत्येकी दोन तासाचे झालेले स्त्री पुरुष आणि एकूण मतदानाची टक्केवारी देत आहेत त्याप्रमाणे सकाळी सात तीस वाजले पासून ते दुपारी दीड वाजेपर्यंत एकूण दहा गाव मध्ये झालेल्या मतदानाची टक्केवारी पुढील प्रमाणे टाकळी गुरसाळे सकाळी सात ते दुपारी दीड वाजेपर्यंत51.60% नेमतवाडी 55.26%, मेंढापूर 57.79% तुंगत 54.18% पुळुजवाडी 61.64%,खरातवाडी 59.48%, अजोती 68.81%, होळे 43.21%, खेड भोसे 52.59%, बार्डी 60.51% दुपारी दीड वाजेपर्यंत एकूण दहा गावांमध्ये झालेल्या मतदानाची टक्केवारी अशी असून पंढरपूर तालुक्यातील दहा गावांमध्ये मतदान सुरू असलेल्या ठिकाणी चौक पोलीस बंदोबस्त ठेवला असून शांततेत मतदान पार पडत आहे