माहिती अधिकार अंतर्गत माहिती देण्यास उशीर केल्याने

माहिती अधिकारा अंतर्गत मागितलेली माहिती वेळेत दिली नाही

माहिती अधिकार अंतर्गत माहिती देण्यास उशीर केल्याने

माहिती अधिकार अंतर्गत माहिती देण्यास उशीर केल्याने चार वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना खुलासा सादर करण्याचे आदेश

सोलापुरात अर्जदाराने माहिती अधिकारा अंतर्गत मागितलेली माहिती वेळेत दिली नाही. त्यामुळे पोलिस खात्यातील संबंधित जनमाहिती अधिकाऱ्यास माहिती देण्याचे आणि लेखी खुलासा सादर करण्याचे आदेश राज्य माहिती आयुक्तांनी दिले. यातील अर्जदार दिनेशसिंग शीतल यांनी सोलापूरच्या सदर बझार पोलिसांत एक तक्रार अर्ज दिला होता. मात्र या अर्जावर कोणतीही कार्यवाही न झाल्याने त्यांनी सोलापूर पोलीस आयुक्तालाच्या जनमाहिती अधिकाऱ्यांकडे माहितीचा अर्ज केला. आपण दाखल केलेल्या तक्रारी अर्जावरती काय कार्यवाही झाली आहे याची माहिती अर्जदार दिनेशसिंग शीतल यांनी या अर्जाद्वारे मागितली होती. मात्र तत्कालीन जनमाहिती अधिकाऱ्यांनी ही माहिती देण्यास टाळाटाळ केली. शेवटी दिनेशसिंग यांनी राज्य माहिती आयुक्तांकडे या प्रकरणी दाद मागितली असता माहिती अधिकारी यांनी तत्काळ माहिती उपलब्ध करून द्यावी आणि त्याचा अहवाल आयोगास द्यावा असे आदेश दिलेत. तसेच तत्कालीन जन माहिती अधिकारी तथा सहाय्यक पोलिस आयुक्त डॉ. प्रीती टिपरे यांनी माहिती अर्जदारास जाणून बुजून माहिती नाकारली असल्याचे सकृत दर्शनी दिसत आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई का करण्यात येऊ नये याचा खुलासा सादर करण्याचे आदेश देखील राज्य माहिती आयुक्तानी दिलेत. तसेच या प्रकरणी आयोगास कोणतीही पूर्वसूचना न देता तत्कालिन आणि विद्यमान जनमाहिती अधिकारी तसेच तत्कालिन आणि विद्यमान प्रथम अपिलीय अधिकारी द्वितीय अपील सुनावणीस अनुपस्थित राहिले असल्याने त्यांच्याविरुध्द शासन निर्णयानुसार कार्यवाही करण्याची सूचना देखील राज्य माहिती आयुक्तांनी केली आहे.