मराठी पत्रकार संघाच्या पंढरपूर शहराध्यक्षपदी राजेंद्र ढवळे यांची निवड 

पत्रकारांसाठी विविध विषयावर कार्यशाळा,बदललेल्या कायद्यावर मार्गदर्शन शिबिर

मराठी पत्रकार संघाच्या पंढरपूर शहराध्यक्षपदी राजेंद्र ढवळे यांची निवड 

मराठी पत्रकार संघाच्या पंढरपूर शहराध्यक्षपदी राजेंद्र ढवळे यांची निवड 

मराठी पत्रकार संघाच्या पंढरपूर शहराध्यक्षपदी राजेंद्र ढवळे यांची निवड करण्यात आली असून त्यांना शहराध्यक्षपदाचा पदभार देण्यात आल्याचे पत्र मराठी पत्रकार संघाचे राज्य सचिव हरिभाऊ प्रक्षाळे, ज्येष्ठ पत्रकार महेश खिस्ते यांच्या हस्ते देण्यात आले.

निवडीनंतर ढवळे यांचा मराठी पत्रकार संघाच्या वतीने पुष्पहार घालून पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.यावेळी मराठी पत्रकार संघाचे पंढरपूर शहर सहअध्यक्ष विनोद पोतदार, शहर सचिव अपराजित सर्वगोड, प्रसिद्ध प्रमुख सदस्य दत्ता पाटील, सह प्रसिद्धी कबीर देवकुळे, सोहन जैयस्वाल, अरुण जाधव, अमोल गुरव, रामकृष्ण बिडकर, ज्ञानेश्वर शिंदे उपस्थित होते. 

मराठी पत्रकार संघाच्या माध्यमातून पत्रकारांसाठी विविध विषयावर कार्यशाळा,बदललेल्या कायद्यावर मार्गदर्शन शिबिर तसेच पत्रकारांचे आडी-अडचणी आणि प्रश्न सोडवण्यासाठी प्राधान्याने काम करणार असल्याची ग्वाही नूतन शहराध्यक्ष राजेंद्र ढवळे यांनी दिली.