अ. भा. रिपब्लिकन पक्षातर्फे सोमवारी महाड येथे क्रांती सभेचे आयोजन

    20 मार्च 1927 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी चवदार तळ्याच्या पाण्याला स्पर्श करून सत्याग्रह

अ. भा. रिपब्लिकन पक्षातर्फे सोमवारी महाड येथे क्रांती सभेचे आयोजन

अ. भा. रिपब्लिकन पक्षातर्फे सोमवारी महाड येथे क्रांती सभेचे आयोजन

राजस खोबरागडे यांची प्रमुख उपस्थिती

सोलापूर -:सोमवार दिनांक 20 मार्च 2023 रोजी अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षातर्फे चवदार तळे महाड येथे दुपारी 3 वाजता क्रांती सभेचे आयोजन केले असून या सभेस पक्षाचे युवा नेते ऍड. राजस खोबरागडे, प्रदेश अध्यक्ष संजय बोरकर, प्रदेश सचिव डी. के. साखरे,महिला प्रदेश अध्यक्ष प्राचार्या मालाताई गोडघाटे, महिला प्रदेश उपाध्यक्ष पद्मिनी शेवडे, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अमित ढवारे, मायाताई खरे, आप्पा कांबळे ,अनिता शिवशरण (सांगली )समाधान कांबळे ,वैशाली चंदनशिवे (सोलापुर),संतोष मोरे (कोल्हापूर ), मनीषाताई चौधरी (उस्मानाबाद ) आदी उपस्थित राहणार असल्याची माहिती पक्षाच्या अधिकृत सूत्रांनी दिली.

          20 मार्च 1927 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी चवदार तळ्याच्या पाण्याला स्पर्श करून सत्याग्रह घडवून आणला. चवदार तळ्याचा सत्याग्रह हा समतेचा व मानवमुक्तीचा लढा होता. या घटनेला 96 वर्ष पूर्ण होत असून महाड च्या या क्रांतीभूमीत तमाम जनतेने मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे अवाहन पक्षाच्या वतीने करण्यात आले आहे.