पंढरपूर नगरपालिका कामगार संघटनेचा जुनी पेन्शन व इतर मागण्यासाठी तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा

नगरपंचायत नगर परिषद कर्मचारी व संवर्ग कर्मचारी संघर्ष समितीच्या व फेडरेशनच्या वतीने

पंढरपूर नगरपालिका कामगार संघटनेचा जुनी पेन्शन व इतर मागण्यासाठी तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा

पंढरपूर नगरपालिका कामगार संघटनेचा जुनी पेन्शन व इतर मागण्यासाठी तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा

महाराष्ट्र राज्य नगरपंचायत नगर परिषद कर्मचारी व संवर्ग कर्मचारी संघर्ष समितीच्या व फेडरेशनच्या वतीने

संपूर्ण महाराष्ट्रातील शासकीय कर्मचारी, महानगरपालिका नगरपालिका कर्मचारी यांचा १४ मार्च २०२३ पासून राज्यव्यापी संप चालू आहे आज पंढरपूर नगरपरिषद कामगार संघटनेच्या वतीने राज्याचे जनरल सेक्रेटरी अँड.सुनिल वाळूजकर संघटनेचे कार्याध्यक्ष नानासाहेब वाघमारे अखिल भारतीय मजदूर सफाई काँग्रेस चे अध्यक्ष गुरु दोडिया यांच्या नेतृत्वाखाली शासनाचे मागण्याकडे लक्ष वेधण्यासाठी तहसील कार्यालय येथे भव्य मोर्चा काढण्यात आला .यावेळी बोलताना अँड.सुनिल वाळूजकर यांनी सांगितलेकी

महाराष्ट्रातील महानगरपालिका नगरपालिका नगरपंचायत कर्मचारी व राज्य शासकीय कर्मचारी संघटना यांच्या वतीने जुनी पेन्शन योजना लागू करावी, कंत्राटी हंगामी कर्मचारी यांना सेवेत कायम करावे, उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार समान कामाला समान वेतन द्यावे व तोपर्यंत किमान वेतन देण्याची कारवाई करावी, सन २०१५ पासून नवीन स्थापन झालेल्या नगरपंचायत मधील उद्घोघोषणे पूर्वीचे व उद्घोघोषणे नंतरचे सर्व कर्मचारी व सफाई कर्मचारी यांचे विनाशर्त विना अट समावेशन करावे. नवीन नगरपंचायतीमधील सफाई कर्मचाऱ्यांचा आकृतीबंध मंजूर करावा, नगरपरिषद नगरपंचायत कर्मचारी यांना दहा वीस तीस ची आश्वासित प्रगती योजना लागू करावी, अनुकंपाची भरती त्वरित करावी व इतर मागण्यासाठी राज्य शासकीय कर्मचारी व महानगरपालिका, नगरपालिका.नगरपंचायत कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यासाठी दिनांक १४ मार्च २०२३ पासून राज्यव्यापी बेमुदत काम बंद आंदोलन करीत आहेत आज संपाचा दुसरा दिवस आहे या संपामध्ये सोलापूर जिल्ह्यासह राज्यातील १८ लाख कर्मचारी सामील झाले आहेत तसेच सोलापूर जिल्ह्यातील १७ नगरपंचायत व नगरपरिषदेमधील सर्व कर्मचारी संपात सहभागी झाले आहेत त्यामुळे या सर्व मागण्याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी तहसील कार्यालय येथे भव्य मोर्चा काढण्यात आला यावेळी संघटनेच्या वतीने तहसीलदार सुशील बेल्हेकर यांना मागण्याची निवेदन देण्यात आले व आमच्या मागण्या व भावना शासनाकडे पोहोचवाव्यात

शासनाने वेळीच मागण्या मान्य केल्यास वेळ पडल्यास अत्यावश्यक सेवा सुद्धा बंद करण्याचा निर्णय घेण्यात येईल असे अँड.सुनिल वाळूजकर यांनी सांगितले हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी पंढरपूर नगरपरिषद कामगार संघटनेचे कार्याध्यक्ष नानासाहेब वाघमारे सहकार्याध्यक्ष शरद वाघमारे नागनाथ तोडकर उपाध्यक्ष संतोष सर्वगोड, किशोर खिलारे जयंत पवार,अनिल गोयल, प्रीतम येळे,तनुजा सीताप,दत्तात्रय चंदनशिवे,संजय माने, धनजी वाघमारे, दिनेश साठे, संजय वायदंडे, महावीर कांबळे, दर्शन वेळापुरे, आदित्य लोखंडे,अनिल मेहडा,महेश गोयल,सतीश सोलंकी, मदन परमार,श्याम जाधव, विठ्ठल वाघमारे,वैभव दंदाडे, रवींद्र ढवळे,उत्तम ढवळे, रवींद्र पवार दत्तात्रय माने, हनुमंत ताठे, छगन वाघेला सर्व सफाई कर्मचारी व कार्यालयीन कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते