आ. समाधान आवताडे यांची जगलंगी ,बावची, खवे ,यड्राव येथे प्रचार दौरा

अडीच ते तीन वर्षांच्या कार्यकाळात झालेल्या विकास कामांची माहिती दिली,

आ. समाधान आवताडे यांची जगलंगी ,बावची, खवे ,यड्राव येथे प्रचार दौरा

आ. समाधान आवताडे यांची जगलंगी ,बावची, खवे ,यड्राव येथे प्रचार दौरा

गावतील केलेल्या व सुरु असलेल्या विकास कामांच्या माध्यमातून जनतेचं मतरुपी पाठबळ मिळवण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या गावभेट प्रचार दौऱ्याच्या निमित्ताने “भाजप महायुती व मित्र पक्षाचे अधिकृत उमेदवार श्री. समाधानदादा आवताडे” यांनी जंगलगी या गावाला भेट दिली. यावेळी मा. दादांनी राबवलेल्या विविध विकासाच्या धोरणांच्या माध्यमातून झालेल्या गावातील कल्याणकारी विकास कामे जनतेसमोर मांडत उपस्थितांशी संवाद साधला.यावेळी भाजपा व महायुती तसेच मित्रपक्षाचे अधिकृत उमेदवार आ.श्री समाधान दादा यांनी आपल्या अडीच ते तीन वर्षांच्या कार्यकाळात झालेल्या विकास कामांची माहिती दिली, तसेच विकसित व सक्षम मतदारसंघ बनविण्याकरिता २० तारखेला महायुतीच्या ‘कमळ’ या चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड मताधिक्क्याने निवडून द्यावे, असे आवाहन या निमित्ताने श्री. समाधानदादा यांनी केले.सदर प्रसंगी श्रीमती रुख्मिणीताई दोलतोडे, श्री. प्रवीण खांडेकर, श्री. दीपक भोसले, श्री. जमदाडे सर, श्री. राजेंद्र सुरवसे, श्री. दिपक भोसले, सरपंच श्री. आमसिध्द चोखेडे, श्री. निगोंडा पाटील, श्री. मल्लाप्पा चोखेडे, श्री. रंगाप्पा चोखेडे, श्री. आप्पू कस्तुरे, श्री. सिदमल चौघुले, श्री. राजू भोसले, श्री. अंकुश चोपडे आदी मान्यवरांसह महायुतीचे पदाधिकारी, सहकारी कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.