पंढरपूर नगर परिषदेच्या वतीने कर वसुली व गाळा भाडे वसुलीसाठी विशेष मोहीम

पंढरपूर नगर परिषदेच्या वतीने कर वसुली व गाळा भाडे वसुलीसाठी विशेष मोहीम

पंढरपूर नगर परिषदेच्या वतीने कर वसुली व गाळा भाडे वसुलीसाठी विशेष मोहीम

पंढरपूर नगर परिषदेच्या वतीने कर वसुली व गाळा भाडे वसुलीसाठी विशेष मोहीम

पंढरपूर नगरपरिषदेच्या वतीने शहरातील थकीत कराची व गाळा भाड्याची रक्कम वसूल करण्यासाठी विशेष मोहीम

 हाती घेण्यात आली असून त्यासाठी कर्मचाऱ्यांची पथके तयार करण्यात आले असल्याची माहिती मुख्याधिकारी अरविंद माळी यांनी दिली

 यावेळी त्यांनी सांगितले की पंढरपूर शहरांमध्ये १९००० मालमत्ता धारक व ५००० झोपडपट्टी धारक तसेच ६०० गाळा धारक असून यापैकी आठ ते दहा हजार मालमत्ताधारकांच्या कडे कोरोना काळापासून मोठ्या प्रमाणात सुमारे १७ कोटी कराची व गाळा भाड्याची रक्कम येणे थकबाकी राहिली आहे सदर मालमत्ताधारक व झोपडपट्टी धारक यांना महाराष्ट्र नगरपालिका अधिनियम १९६५ मधील नुसार तरतुदी नुसार मागणी बील, जप्तीपूर्व सूचना व जप्तीच्या नोटिसा देऊनही अद्याप पर्यंत गाळा भाड्याची व मालमत्ता कराची रक्कम भरलेली नाही त्यामुळे नगर परिषदेने कर व भाडे वसुलीसाठी विशेष मोहीम हाती घेतली असून त्यासाठी उपमुख्याधिकारी सुनील वाळूजकर, कर अधीक्षक बाळासाहेब कांबळे यांच्या अधिपत्याखाली ९ विशेष वसुली पथके तयार करण्यात आली आहेत व याकामी ३५ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहेत. तरी शहरातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की आपणाकडे असलेली कराची रक्कम व गाळा भाड्याची रक्कम त्वरित भरून नगरपरिषदेस सहकार्य करावे अन्यथा नगरपरिषदेस आपल्या मालमत्ता मधील नळ तोडणे, मालमत्ता धारक यांच्या स्थावर व जंगम मालमत्ता जप्ती करणे, घरासमोर स्पीकर द्वारे थकबाकीची रक्कम भरण्याबाबत अनौंसिंग करणे, वृत्तपत्रात नावे प्रसिद्ध करणे यासारखे कटू कारवाई या विशेष वसुली पथकाद्वारे करण्यात येणार आहे तरी सदरची कटुता टाळण्यासाठी आपली कराची रक्कम त्वरित भरावी असे आवाहन मुख्याधिकारी अरविंद माळी यांनी केले आहे