विठ्ठल चे चेअरमन अभिजीत पाटील नेमके राष्ट्रवादीचे का भाजपचे चर्चेला उधान

खासदार शरद पवार म्हणालेअभिजीत चला बसा गाडी त

विठ्ठल चे चेअरमन अभिजीत पाटील नेमके राष्ट्रवादीचे का भाजपचे चर्चेला उधान

विठ्ठल चे चेअरमन अभिजीत आबा पाटील नेमके राष्ट्रवादीचे का भाजपचे चर्चेला उधा

पंढरपूर दिनांक 19 सप्टेंबर सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील टेंभुर्णी येथील आमदार राष्ट्रवादीचे संजय मामा शिंदे यांच्या फार्म हाऊस वर राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष माननीय श्री खा .शरद पवार आज आले होते. राष्ट्रवादीचे आमदार संजय मामा शिंदे यांच्या फार्म हाऊस वर राष्ट्रवादीची बैठक झाली आणि बैठक संपल्यानंतर पंढरपूरचे साखर सम्राट युवा उद्योजक श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांना शरद पवार म्हणाले की चला अभिजीत माझ्या गाडीत बसा असे राष्ट्रवादीचे खासदार शरद पवार अभिजीत पाटील यांना म्हणतात त्यामुळे यामागे काहीतरी शरद पवार यांच्या डोक्यात सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणातील मोठ्या घडामोडी करण्याचा हेतू असावा अशी चर्चा उपस्थित असणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये आणि संपूर्ण सोलापूर जिल्ह्यामध्ये सुरू झाली . चर्चा फार्म हाऊस वर कार्यकर्त्यांमध्ये रंगली परंतु खासदार शरद पवार फक्त अभिजीत पाटील यांना माझ्या गाडीत बसा चला का म्हणाले हे अभिजीत पाटील यांनाच ठाऊक. अभिजीत आबा पाटील यांच्या6ठिकाणच्या कारखान्यावर आणि पंढरपूर येथील कार्यालय आणि घरावर गेल्या महिन्यात इन्कम टॅक्स अधिकारी यांनी धाड टाकली होती. त्यावेळी भाजपचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर हे पंढरपूरला आले असता त्यांनी चेअरमन श्री अभिजीत पाटील यांची आवर्जून त्यांच्या कार्यामध्ये भेट घेतली त्यावेळी कार्यकर्ते व पत्रकारांसमोर श्री प्रवीण दरेकर म्हणाले की अभिजीत पाटील हे आपलेच आहेत ते भाजपमध्ये ही येतील असे म्हणाल्यामुळे या संपूर्ण सोलापूर जिल्ह्यामध्ये राजकारणात वेगळाच ठसा उमटू लागला आणि आणि संपूर्ण सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रवीण दरेकर यांच्या वक्त्यावर चर्चा सुरू झाली. आणि सोशल मीडिया व प्रसारमाध्यमांनी या वक्तव्याच्या बातम्या प्रसिद्ध केल्या आहेत .त्यानंतर आज सोमवार दिनांक 19 सप्टेंबर रोजी माढ्यातील राष्ट्रवादीचे आमदार श्री संजय मामा शिंदे यांच्या फार्म हाऊसवर खासदार शरद पवार यांनी आमदार व राष्ट्रवादी कार्यकर्त्यांची बैठक घेतली. आणि चेअरमन अभिजीत पाटील यांना अभिजीत चला बसा माझ्या गाडीत असे शरद पवार म्हणाले त्यामुळे पुन्हा सोलापूर जिल्ह्यामध्ये चर्चेला ऊत आला आहे.