तंटामुक्त अध्यक्षपदी संजय मणुरे यांची बिनविरोध निवड.

बिनविरोध निवड झाल्याबद्दल श्री महेश घंटे मित्र परिवाराकडून जाहीर सत्कार

तंटामुक्त अध्यक्षपदी संजय मणुरे यांची बिनविरोध निवड.

तंटामुक्त अध्यक्षपदी संजय मणुरे यांची बिनविरोध निवड

सोलापूर दी.२९ ऑगस्ट (श्री संजय पवार) अक्कलकोट तालुक्यातील हालचिंचोली गावच्या नूतन तंटामुक्त समिती अध्यक्षपदी श्री संजय मणुरे यांची सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांच्या वतीने तंटामुक्त अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

अक्कलकोट तालुक्यातील हालचिंचोली हे महत्त्वाचे गाव व तालुक्याचे केंद्र म्हणून ओळखले जाते या गावातील लोकप्रिय व सर्वसमावेशक सर्वांचे आवडते संजय मणूरे यांची गावच्या तंटामुक्त अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल श्री महेश घंटे मित्र परिवाराकडून त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला.

या निवडी वेळी मावळते तंटामुक्त अध्यक्ष भालचंद्र कांबळे सरपंच भीमाबाई बनसोडे उपसरपंच श्रीशैल माशाळे पोलीस पाटील किरण सुरवसे ग्रामसेवक कट्टी मनी सर्व ग्रामपंचायत सदस्य तसेच महेश घंटे मित्र परिवाराचे योगिनाथ जामदार अब्दुल हदीमनी राजकुमार करनाचे शावर सिद्ध सुरवसे उपस्थित होते.

या सत्कार प्रसंगी श्री महेश घंटे यांनी माजी तंटामुक्ती अध्यक्ष यांनी गावातील तसेच तालुक्यातील तंटा मिटवून गावाचे नाव उज्वल केले आहे नूतन विद्यमान अध्यक्ष हा आलेख नक्कीच वाढतील अशी आशा व्यक्त केली . श्री महेश घंटे यांच्या सत्कार ला उत्तर देताना गावातील तसेच संपूर्ण तालुक्यातील तंटा आपण हद्दपार करू असे विश्वास अध्यक्ष श्री संजय मणुरे यांनी व्यक्त केलाआहे.