जे आमदाराना जमले नाही ते नितिन काळे यांनी करून दाखवले. 

अहिल्यादेवी होळकर घरकुल योजनेच्या फाईलवर अखेर मुख्यमंत्री यांचा आदेश

जे आमदाराना जमले नाही ते नितिन काळे यांनी करून दाखवले. 

जे आमदाराना जमले नाही ते नितिन काळे यांनी करून दाखवले. 

धनगर समाजासाठी 1 786 पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घरकुल योजना मंजूर.

भाजपा युवा मोर्चा प्रदेश सचिव नितीन काळे यांनी गेले तीन दिवसापासून मुंबई मंत्रालय मध्ये तळ ठोकून बसल्याने आज शुक्रवार दिनांक 11 ऑक्टोंबर 2024 रोजी अखेर धनगर समाजातील गोरगरीब सामान्य लोकांसाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा.एकनाथ शिंदे यांच्याकडून 1786 अहिल्यादेवी होळकर घरकुल योजना मंजूर करून आणली आहे.

11 ऑक्टोबर2024 रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा.एकनाथ शिंदे यांनी आज अहिल्यादेवी होळकर घरकुल योजनेच्या 1786 घराच्या फाईलवर मंजुरी दिली असून आज तो आदेश मुख्यमंत्री यांच्या सहीने आदेश देण्यात आला आहे. भाजप युवा मोर्चाचे प्रदेश सचिव नितीन काळे हे धनगर समाज बांधवांसाठी तन-मन-धन आणि पूर्णपणे झोकून समाजसेवा करीत असलेने त्यांना धनगर समाजामध्ये मानाचे स्थान आहे. त्याचबरोबर भाजपा युवा मोर्चाचे सचिव पदी त्यांचे काम सोलापूर जिल्ह्यात उत्कृष्ट असल्याने त्याना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे ते जवळच्या व निकट वरती पदाधिकारी कार्यकर्ता म्हणून ओळख आहे. त्यामुळेच आज अखेर धनगर समाज बांधवांसाठी नितीन काळे यांनी 1786 अहिल्या घरकुल योजना मंजूर करून आणले आहे. त्यामुळे सोलापूर जिल्हा पंढरपूर तालुक्यातील धनगर समाज बांधवातून कौतुक केले जात आहे.