आमदार समाधान आवताडेंनी केली पूर परिस्थितीची पाहणी

पुनर्वसन करण्यासाठी आमदार समाधान आवताडे यांनी प्रयत्न करणार असल्याचे पूरग्रस्तांना आश्वासन दिले. 

आमदार समाधान आवताडेंनी केली पूर परिस्थितीची पाहणी

आमदार समाधान आवताडेंनी केली पूर परिस्थितीची पाहण

पंढरपूर दि. 18 : चंद्रभागा नदीकाठच्या झोपड्यात दरवर्षी पाणी जात असल्याने स्थलांतरित करण्याची वेळ येते. तसेच प्रशासनावर या सगळ्या गोष्टींचा ताण पडतो. त्यामुळे या नागरिकांचे चांगल्या जागेत पुनर्वसन करण्यासाठी आमदार समाधान आवताडे यांनी प्रयत्न करणार असल्याचे पूरग्रस्तांना आश्वासन दिले. 

आज उजनी आणि वीर धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे पंढरपूरातील सकल भागात पुराचे पाणी शिरले होते. अंबिका नगर आणि व्यास नारायण झोपडपट्टीमधील 20 आणि ग्रामीण भागातील 2 कुटुंबांचे असे एकूण 22 कुटुंबांचे स्थलांतर करण्यात आले आहे. 

आज आमदार समाधान आवताडे यांनी पूर परिस्थितीची पाहणी केली. त्यांच्या सोबत प्रांताधिकारी गजानन गुरव, उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम, तहसीलदार सुशील बेल्हेकर, मुख्याधिकारी अरविंद माळी, भाजपचे शहराध्यक्ष विक्रम शिरसाट आदी अधिकारी आणि पदाधिकारी उपस्थित होते. 

यावेळी पूरग्रस्तांनी आमदार समाधान आवताडे यांच्याकडे पक्क्या घराची मागणी केली. झोपडपट्टीतील लोकांना दरवर्षी पुराला सामोरे जावे लागले. आमचे चांगल्या जागी स्थलांतर करण्याची मागणी आमदार आवताडे यांच्याकडे केली. 

उजनी आणि वीर धरणातून सोडलेले पाणी चंद्रभागा नदीपात्रात असताना नागरीकांना स्थलांतरित करण्याची वेळ येत आहे. दरवर्षी नदीपात्रातील लोकांचे स्थलांतर करावे लागत आहे. त्यांचे कायमचे पुनर्वसन करण्यासाठी सरकारकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन आमदार समाधान आवताडे यांनी पूरग्रस्तांना दिले. 

उजनी धरणात येणारी पाण्याची आवक कमी झाल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. उजनी धरणातून 101600 क्यूसेक पाणी नदीपात्रात सोडण्यात येत आहे तर वीर धरणातून 4600 क्यूसेक पाणी सोडण्यात येत आहे. पंढरपूरात चंद्रभागा नदी 119000 क्यूसेकने वाहत आहे. ::