कार्तिक यात्रेच्या तोंडावर पंढरीत झिका व्हायरसचा रुग्ण सापडल्याने आरोग्य प्रशासन समोर मोठे आव्हान.

पर राज्यातून महाराष्ट्रातून वारकरी भावीक पंढरीत येतात

कार्तिक यात्रेच्या तोंडावर पंढरीत झिका व्हायरसचा रुग्ण सापडल्याने आरोग्य प्रशासन समोर मोठे आव्हान.

कार्तिक यात्रेच्या तोंडावर पंढरीत झिका व्हायरसचा रुग्ण सापडल्याने आरोग्य प्रशासन समोर मोठे आव्हान.

पंढरपूर कार्तिक यात्रा पाच ते सहा दिवसावर येऊन ठेपली आहे परंतु दोन दिवसापूर्वी पुणे कोल्हापूर नंतर पंढरपूर मध्ये झिका व्हायरसचा संशयीत रुग्ण सापडला असल्यामुळे सध्या तरी पंढरीत झीका व्हायरस बाबत खळबळ उडाली असून संपूर्ण जिल्हाभर चर्चा सुरू आहे.

येत्या 23 नोव्हेंबर रोजी पंढरपूर कार्तिक एकादशी सोळा संपन्न होणार असल्याने श्री विठ्ठल रुक्मिणीचे दर्शनासाठी अनेक राज्यातून महाराष्ट्रातून मुंबई पुणे आंध्रा कर्नाटक बेळगाव कोल्हापूर सातारा सांगली या जिल्ह्यातून अनेक वारकरी भावीक पंढरीत येतात त्यामुळे पंढरपूर शहरातील व्यापारी नागरिकांना मात्र दक्षता घ्यावी लागणार आहे. कोल्हापूर शहरात एका चांगल्या डॉक्टरांना झिका व्हायरसची लागण होऊन मृत्यूला सामोरे जावे लागले आहे.

पंढरपूर कार्तिक एकादशी सोहळ्यासाठी पंढरीत येणाऱ्या वारकरी भाविकांसह शहरातील नागरिकांनाही झिका व्हायरस लागण होऊ नये यासाठी आरोग्य प्रशासन समोर मोठे आव्हान असणार आहे. पंढरपूर नगरपरिषद हिवताप जीव शास्त्रज्ञ म्हणून कार्यरत असणाऱ्या शुभांगी आधटराव यांना पंढरपूर मधील नेत्र तज्ञ डॉक्टरांना झालेल्या झिका व्हायरसची लागण संदर्भात माहिती घेतली असता सदर नेत्ररोग तज्ञ डॉक्टर हे मुंबईला मुलाकडे गेले होते आणि त्यांना तिकडून इकडे आल्यानंतर दहा ते पंधरा दिवसांनी उलटी जुलाब डोकेदुखी हा त्रास सुरू झाला असल्याने त्यांना मुंबईमध्येच झिका व्हायरसची लागण झालेली आहे असे सांगितले. परंतु येणाऱ्या कार्तिक एकादशी सोहळ्यासाठी अनेक राज्यातून महाराष्ट्रातून वारकरी भाविक पंढरीत येतात त्यामुळे सध्या तरी आरोग्य प्रशासनासमोर मोठे आव्हान असणार आहे हे मात्र नक्की.