आई गेली परीक्षेला; महिला पोलिसांनी चार महिन्यांच्या बाळाला दिली मायेची ऊब.

परीक्षा केंद्रावर एका चार महिन्यांच्या बाळाचा सांभाळ करणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांच्या व्हिडिओ

आई गेली परीक्षेला; महिला पोलिसांनी चार महिन्यांच्या बाळाला दिली मायेची ऊब.

आई गेली परीक्षेला; महिला पोलिसांनी चार महिन्यांच्या बाळाला दिली मायेची ऊब

सध्या पुणे महापालिकेच्या विविध पदांसाठी भर ती प्रक्रिया सुरू आहे.बुधवारी दुपारी विधी अधि कारीपदासाठी रामटेकडी येथील एका केंद्रावर परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेला अनेक विवा हित महिला देखील परीक्षेसाठी बसल्या होत्या. तसेच काही गरोदर महिला सोबत काही महिला लहान बाळांना सोबत घेऊन आल्या होत्या. तसे च अनेक महिलांचे नातेवाईक देखील सोबत आले होते.

पुण्यातील हडपसर परिसरात असणाऱ्या राम टेकडी परिसरातील परीक्षा केंद्रावर एका चार महिन्यांच्या बाळाचा सांभाळ करणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांच्या व्हिडिओ सध्या सोशल मीडिया वर चांगलाच व्हायरल होत आहे.परीक्षा केंद्रावर दुपारी आपले चार महिन्यांचे बाळ घेऊन परीक्षा केंद्रावर त्या आल्या होत्या. केंद्रात परीक्षा देणा ऱ्यांशिवाय कुणालाही प्रवेश नव्हता त्यात परी क्षा केंद्राच्या आजूबाजूच्या परिसरात सावलीत बसण्यासाठी झाड देखील नव्हते. त्यामुळे अशा परिस्थितीत बाळाला घेऊन कुठे बसायचे हा प्रश्न बाळाच्या वडीलांसमोर होता काही वेळानंतर सुर क्षा रक्षकाने बाळाला घेऊन केंद्राच्या जवळ च्या परिसरात बाळाला घेऊन बसण्यास सांगितले.

मात्र, बाळ रडायला लागले. ते वडिलांना देखील त्याच रडू थांबवता येइना, तेव्हा परीक्षा केंद्रावर असणाऱ्या महिला पोलीस अधिकारी आणिकर्म चाऱ्यांनी त्या बाळाला आपल्या कुशीत घेऊन त्याच्यासोबत खेळले. त्याच्या आईची परीक्षा संपेपर्यंत त्या बाळाला मायेची ऊब देण्याचा प्रय त्न केला. कर्तव्यावर असताना महिला पोलिसां नी माणुसकी जपत त्या बाळाला सांभाळ केला.