यंदा गोरगरीब व सामान्यांची दिवाळी गोड होणार

एकूण तब्बल 1 कोटी 62 लाख 42हजार शिधापत्रिकाधारकांना अल्प दरात

यंदा गोरगरीब व सामान्यांची दिवाळी गोड होणार

यंदा गोरगरीब व सामान्यांची दिवाळी गोड होणा

फक्त 100 रुपयात 4वस्तूचे पॅकेज

शिंदे व फडणवीस सरकारकडून दिवाळी गिफ्टची घोषणा 100रुपयात मिळणार रवा डोळा साखर आणि तेल.

मुंबई महाराष्ट्र राज्यात नवीन स्थापन झालेल्या शिंदे व फडणवीस सरकारकडून महाराष्ट्र राज्यातील शिधापत्रिकाधारक जनतेची दिवाळी गोड करण्यात येणार आहे. कारण राज्यातील जनतेला सरकारकडून केवळ 100 रुपयात रवा डाळ साखर आणि तेल मिळणार आहे. गेल्या आठवड्यात झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत राज्य सरकारने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

एकूण तब्बल 1 कोटी 62 लाख 42हजार शिधापत्रिकाधारकांना अल्प दरात दिवाळी फराळासाठी आवश्यक साहित्य दिले जाणार आहे. त्यांना रवा चणाडाळ साखर आणि पामतेल देण्याची योजना असून त्या पोटी सरकारी तिजोरीवर सुमारे 500 कोटीचा आर्थिक भार पडणार आहे.