सोलापूर जिल्ह्यातील नवीन नगरपंचायत व नगरपरिषद कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्याबाबत विभागीय आयुक्त पुणे कार्यालय येथे बैठक संपन्न
महाराष्ट्र राज्य नगर परिषद कर्मचारी समन्वय समितीच्या वतीने पुणे विभागीय आयुक्त कार्यालय येथे .

सोलापूर जिल्ह्यातील नवीन नगरपंचायत व नगरपरिषद कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्याबाबत विभागीय आयुक्त पुणे कार्यालय येथे बैठक संपन्
पुणे दि .21 जुलै महाराष्ट्र राज्य नगर परिषद कर्मचारी समन्वय समितीच्या वतीने पुणे विभागीय आयुक्त कार्यालय येथे राज्याचे जनरल सेक्रेटरी अँड सुनील वाळूजकर यांच्या नेतृत्वाखाली पंढरपूर नगर परिषद कामगार संघटनेचे कार्याध्यक्ष शरद वाघमारे, नागनाथ तोडकर,कराड नगर परिषद कामगार संघटना अध्यक्ष आनंदराव खवळे, किशोर पवार,आठवले मैंदर्गी नगर परिषदेचे कामगार नेते खाजाप्पा दादानवरू वैराग नगरपालिका कामगार नेते किरण वाघमारे, श्रीपुर महाळुंग नगर परिषदेचे कामगार नेते रघुनाथ चव्हाण यांच्या शिष्टमंडळ समवेत नगरपरिषद कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यासाठी उप आयुक्त दत्तात्रय लांघी व अधीक्षक तापकीर यांच्यासमवेत बैठक झाली या बैठकीमध्ये कराड नगरपरिषद येथील 103 कर्मचाऱ्यांना कायम करणेच्या प्रस्तावास मान्यता मिळावी व 11 सफाई कामगार यांची पदे भरणेसाठी अधिसख्य पदे निर्मिती करणेसाठी मंजुरी मिळावी तसेच श्रीपुर महाळुंग व वैराग नगर ,अनगर या नवीन नगरपंचायत कर्मचाऱ्यांचा समावेशनाचा प्रश्न त्वरित मार्गी लावावा, मैंदर्गी नगर परिषदेमधील मल्लिकार्जुन मगेनवरू यांना वारसा हक्काने नियुक्ती देण्याबाबतच्या प्रस्तावास मंजुरी मिळावी तसेच जिल्ह्यातील नवीन झालेल्या अनगर व इतर राहिलेल्या नगरपरिषदेमध्ये ज्या कर्मचाऱ्यांचे अद्याप समावेशन राहिलेले आहे त्यांचे प्रस्ताव त्वरित पाठवावेत ते ही मंजूर करण्यात येतील असा निर्णय या बैठकीत घेण्यात आला
सर्व मागण्या लवकरात लवकर मार्गी लावण्याचा आश्वासन उप आयुक्त दत्तात्रय लांघी यांनी यावेळी दिले यावेळी सुदाम खेंदाड, सचिन पानबुडे,दत्तात्रय यादव,शेखर भोसले, महादेव जाधव हे उपस्थित होते