पंढरपूर शहराला दिनांक 30 जानेवारीपासून एक दिवसा आड पाणी पुरवठा होणार  पंढरपूर

५० दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा उपलब्ध

पंढरपूर शहराला दिनांक 30 जानेवारीपासून एक दिवसा आड पाणी पुरवठा होणार   पंढरपूर

पंढरपूर शहराला दिनांक 30 जानेवारीपासून एक दिवसा आड पाणी पुरवठा होणार 

पंढरपूर दिनांक 29 जानेवारी पंढरपूर शहराला दगडी पुला जवळ असलेल्या बंधाऱ्या मधून पाणी पुरवठा केला जातो परंतु सद्यस्थितीमध्ये उजनी धरण पाणलोट क्षेत्रामध्ये चालू वर्षांमध्ये पर्जन्यमान कमी झाल्याने उजनी धरणातील पाणीसाठा कमी झालेला आहे उजनीची पाणी पातळी लक्षात पंढरपूर शहरातील पाणी पुरवठया मध्ये कपात करणे आवश्यक आहे तसेच दगडी पुलाजवळील असलेल्या बंधाऱ्यांमध्ये ४० ते ५० दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा उपलब्ध आहे.त्यामुळे पंढरपूर शहराला एक दिवसा आड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय नगरपरिषदेने घेतला असून आज दिनांक २९ जानेवारी २०२४ रोजी रुळाच्या खालील भागास व दि.३० जानेवारी २०२४ पासून रुळाच्या वरच्या भागाला पाणी पुरवठा होईल. त्यानंतर दररोज एक दिवसा आड पाणीपुरवठा होणार आहे.तरी पंढरपूर शहरातील सर्व नागरिकांनी पाण्याची सद्यस्थिती पाहता काटकसरीने पाण्याचा वापर करावा असे आवाहन पंढरपूर नगर परिषदेच्या वतीने करण्यात येत आहे.