भगीरथ भालके यांना त्यांची जागा दाखवून देण्याची वेळ आली आहे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील.

बटेंगे तो कटेंगे नाही, पढेंगे तो बचेंगे

भगीरथ भालके यांना त्यांची जागा दाखवून देण्याची वेळ आली आहे  प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील.
भगीरथ भालके यांना त्यांची जागा दाखवून देण्याची वेळ आली आहे  प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील.

भगीरथ भालके यांना त्यांची जागा दाखवून देण्याची वेळ आली आहे

प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील.

छत्रपती शिवाजी महाराज चौक, शिवतीर्थ पंढरपूर या ठिकाणी आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची जाहीर सभा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेबांच्या उपस्थितीत पार पडली.या सभेला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जेष्ठ नेते विजयसिंह मोहिते पाटील, प्रा. लक्ष्मण ढोबळे, साहेब, पक्ष निरीक्षक शेखर माने साहेब, रवी पाटील,जिल्हा परिषद सदस्य वसंत नाना देशमुख साहेब, सुभाष दादा भोसले, अमर सूर्यवंशी, महिला आघाडीच्या पदाधिकारी सुवर्णाताई शिवपुरे, पूनम अभंगराव, राजश्री ताड, वृषाली इंगळे, शुभांगी ताई, साधना राऊत , चारुशीला कुलकर्णी, पूर्वा ताई, अनिता पवार ,सुनंदा उमाटे , रेखा ताई, काजल भोरकडे, डॉ श्रीमंत कोकाटेजी आदी मान्यवर आणि महाविकास आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते.

महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार अनिल सावंत हेच आहेत. भगीरथ भालके यांनी पवार साहेबांकडे उमेदवारीसाठी मुलाखत दिली होती. मात्र पवार साहेबांनी निर्णय घ्यायचा अगोदरच, त्यांनी वेगळी भूमिका घेतली. हा पवार साहेबांचा अपमान आहे. त्यामुळे या उमेदवाराला त्याची जागा दाखवण्याची ही वेळ आल्याचं मत जयंत पाटील साहेबांनी मांडले.सोबतच अनिल सावंत यांना पवार साहेबाचे आशीर्वाद असल्याचं सांगत, साहेबांनी विजयाची खात्री दिली. 

देशात प्रचंड मोठ्या प्रमाणात बेरोजगारी, महागाई, शेतकरी संतप्त आहे. मात्र या मूलभूत समस्यांकडे बघायला भाजपला वेळ नाही. भाजप फक्त जाती धर्मांमध्ये भांडणे लावण्याचा प्रयत्न करत आहे. देशाचे गृहमंत्री अमित शहा म्हणतात, बटेंगे तो कटेग त्यांना सांगितलं पाहिजे. बटेंगे तो कटेंगे नाही, पढेंगे तो बचेंगे.म्हैसाळच्या पाण्याचा प्रश्न आम्ही सोडविणार. मंगळवेढा तालुक्यातील पाणी प्रश्न आमचेच सरकार सोडवणार, असं सांगत येणाऱ्या 20 तारखेला तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हासमोरील बटन दाबून विजयी करण्याचे आवाहन जयंत पाटील साहेबांनी उपस्थितांना केले.