अभाविप च्या आंदोलन कार्यकर्त्यावर सोलापूर विद्यापीठात पोलिसांचा अमानुष लाठीमार
अधिकाराचा गैरवापर करून शिक्षकेतर कर्मचारी आणि पोलीस प्रशासन यांना हाताशी धरून कार्यकर्त्यांना बेदम मारहाण
 
                                अभाविप चा विविध रास्त मागण्यांना घेऊन विद्यापीठात आंदोलन, कुलगुरूंच्या भाडोत्री कर्मचारी व पोलिसांनी केली कार्यकर्त्यांना जबर मारहाण
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ येथे अभाविप च्या कार्यकर्त्यांनी विविध रास्त मागण्यांना घेऊन अधिसभा बैठक उधळून लावण्याचा प्रयत्न केला.खुल्या विद्यार्थी निवडणुका सुरू झाल्या पाहिजे,
कमवा व शिका योजनेला घेऊन विद्यापीठाची उदासीनता, उपहारगृह भ्रष्टाचार, पदवी प्रमाणपत्र लवकर मिळावी, अभ्यासमंडळावर केलेली बेकायदेशीर नियुक्ती अशा विविध मागण्या मान्य झाल्या पाहिजे आणि भ्रष्टाचाराची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी अभाविप च्या कार्यकर्त्यांनी वारंवार निवेदनाद्वारे विद्यापीठ प्रशासनाला केली होती.परंतु विद्यापीठ प्रशासन याविषयाला घेऊन गांभीर्य दिसत नव्हती.यामुळे अधिसभा बैठक उधळून या रास्त मागण्या कुलगुरुंसमोर मांडण्याचा प्रयत्न कार्यकर्त्यांचा होता.परंतु आपल्या अधिकाराचा गैरवापर करून शिक्षकेतर कर्मचारी आणि पोलीस प्रशासन यांना हाताशी धरून कार्यकर्त्यांना बेदम मारहाण करण्यात आली आणि कार्यकर्त्यांना अटक करण्यात आले.यावेळी प्रदेश सहमंत्री रोहित राऊत, महानगर मंत्री आदित्य मुस्के, महानगर सहमंत्री सागर टक्कळकी, महानगर सहमंत्री श्रीनाथ गायकवाड व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
 
                        
 Haribhau Prakshale
                                    Haribhau Prakshale                                

 
                    
                 
                    
                 
                    
                 
                    
                 
                    
                 
                    
                 
                    
                
 
            
             
            
             
            
             
            
             
            
             
            
             
            
             
            
             
            
             
            
             
            
                                        
                                    