सोलापूर सिव्हील पोटफाडी चौकात दोन गटात तुफान दगडफेक.

सोलापूर सिव्हील पोटफाडी चौकात दोन गटात तुफान दगडफेक.

सोलापूर सिव्हील पोटफाडी चौकात दोन गटात तुफान दगडफेक.

सोलापूर सिव्हील पोटफाडी चौकात दोन गटात तुफान दगडफेक.

सोलापूर येथील सिव्हील हॉस्पिटल जवळ पोटफाडी चौका मध्ये रविवारी रात्री सव्वा अकराच्या सुमारास दोन गटात तुफान दगडफेकीची घटना घडली. त्यामुळे काही काळ परिसरात नाही निर्माण झाला होता यावेळी एक मालवाहू मिनी टेम्पोच्या काचा फोडल्या तर दोन दुचाकींची तोडफोड करण्यात आली.

रविवार रात्री सव्वा अकराच्या सुमारास सिविल हॉस्पिटल जवळ चौकामध्ये अचानक दोन गट समोरासमोर आले आणि त्या गटातील कार्यकर्त्यांनी परिसरात दगड फेक करणेस सुरुवात केली. यावेळी जमावाने तेथून जाणाऱ्या एका मालवाहतूक मिनी टेम्पोच्या काचा फोडल्या व दोन दुचाकीची मोडतोड केली. यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दगडफेकीचे नेमके कारण समजू शकले नाही परंतु घटनेची माहिती मिळताच सदर बाजार व जेलरोड पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तसेच आरसीपी पथकाने घटनास्थळी पोचले आणि तात्काळ जमाव पांगवला त्यानंतर परिसरात शांतता निर्माण झाली.