आवताडे शुगर अँण्ड डिस्टीलरीज प्रा.लि,नंदूर या साखर कारखान्याचा द्वितीय गाळप हंगामाचा "बॅायलर अग्नि प्रदीपन

आमदार मा.श्री.समाधान (दादा)आवताडे साहेब तसेच भैरवनाथ शुगर्सचे चेअरमन मा.अनिल सावंत यांच्या हस्ते

आवताडे शुगर अँण्ड डिस्टीलरीज प्रा.लि,नंदूर या साखर कारखान्याचा द्वितीय गाळप हंगामाचा "बॅायलर अग्नि प्रदीपन

आज आवताडे शुगर अँण्ड डिस्टीलरीज प्रा.लि,नंदूर या साखर कारखान्याचा द्वितीय गाळप हंगामाचा "बॅायलर अग्नि प्रदीपन" हे आपल्या मतदारसंघाचे कर्तव्यदक्ष व लोकप्रिय आमदार मा.श्री.समाधान (दादा)आवताडे साहेब तसेच भैरवनाथ शुगर्सचे चेअरमन मा.अनिल सावंत यांच्या हस्ते होम हवन व बॅायलर अग्नीप्रदीपण करून संपन्न झाला . यावेळी ऊस उत्पादक शेतकरी तसेच कामगार बंधूंसमवेत संवाद साधताना आमदार दादाश्री यांनी सांगितले की, गेल्या वर्षी कमी कालावधीत व अचानक सुरू होऊनही या कारखान्याकडे अपुरी यंत्रणा,सामग्री तसेच इतर कारखान्यांकडून सहकार्य घेऊन ही गळीत हंगाम यशस्वीरित्या पार पाडत या भागातील शेतकऱ्यांच्या पाठीशी हा कारखाना सक्षमपणे उभा राहिला ही कौतुकाचा बाब आहे.

आज कारखान्यामध्ये सहाशे ते सातशे कर्मचारी काम करत आहेत मात्र येत्या वर्ष ते दीड वर्षाच्या काळात ही संख्या हजार ते साडेबाराशे च्या आसपास जातील अशाच प्रकारे सर्वोपरि हा कारखाना सभासदांच्या तसेच जनतेच्या पाठीशी उभा राहील हा विश्वास व्यक्त करत जनतेला दुष्काळाबाबत सतर्क करत दुष्काळी परिस्थिती असल्यामुळे सर्वांनाच पाणी जपून वापरावे लागणार असून उजनीमध्ये असणाऱ्या आपल्या हक्काच्या पाण्याचे आवर्तन आपण घेणारच आहोत तसेच म्हैसाळचे पाणी सर्व गावांना नियमाप्रमाणे मिळणार आहे हा विश्वास आमदार दादाश्री यांनी उपस्थितांना यावेळी दिला .

     तसेच मागील पंधरवड्यात थोडासा पाऊस झाल्यामुळे चारा टंचाईची मागणी कमी झाली होती मात्र आता पाऊस लांबल्याने चारा टंचाई जाणवत आहे त्यासाठी चारा डेपो किंवा चारा छावण्या सुरू करण्यासंदर्भात वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू आहेत. टेंभू योजनेचे पाणी मंगळवेढा तालुक्यातील मान नदीमध्ये येणे अशक्य आहे असे अनेक जण बोलत होते मात्र मी अशक्य गोष्ट शक्य करून दाखवली आहे व टेंभूचे पाणी मान नदीत आणण्याचा हा ऐतिहासिक क्षण नदीकाठच्या लोकांनी अनुभवला आहे. यापुढे या भागात पाण्याची कमतरता भासू देणार नाही मंगळवेढा हा दुष्काळी तालुका आहे म्हणून लागलेला कलंक पुसून या मंगळवेढ्याच्या काळ्या आईला हिरवा शालू नेसवून तालुका सुजलाम सुफलाम करण्याचे माझे ध्येय आहे असे आमदार दादाश्री यांनी मानस व्यक्त करत आवताडे शुगर हा यावेळी शेतकऱ्यांना समाधानकारक दर तर देणारच आहे मात्र त्यामध्येही जे शेतकरी उशिरा कारखान्याला ऊस घालतील त्यांना जाहीर दरापेक्षाही जादा दर देण्याचा आमचा विचार असून त्यावरही लवकरच चेअरमेन-संचालक मंडळ निर्णय घेतील हा विश्वास यावेळी मनोगतात व्यक्त करत संवाद साधला.

        यावेळी कारखाना स्थळावर मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.कुर्मदास चटकेजी ,कार्यकारी संचालक श्री.पिसेजी तसेच एच आर मॅनेजर ज्ञानेश्वर बळवंतराव,प्रहारचे तालुकाध्यक्ष समाधान हेंबाडे, खंडू खंडारे, मिलिंद आटकळे, डीसी जाधव, रावसाहेब राजमाने, सुधाकर फटे, आण्णासाहेब फटे, विष्णू बागल, सचिन हुंडेकरी, गंगाधर काकनकी, बादल सिंह ठाकुर, धीरज म्हमाणे, संदीप पाटील, भीमराव भुसे, सुरेश भाकरे,  राजाभाऊ घायाळ, विवेक खिलारे, बापू मेटकरी, किशोर जाधव, तात्या जगताप, नितीन करंडे, दत्तात्रय शिंदे, अविनाश मोरे, नारायण शिंदे, श्याम पवार, आवताडे स्पिनरचे इन्चार्ज सुनील कमते, चिफ केमिस्ट मोहन पवार, आसवनी प्रमुख संभाजी फाळके, चिफ अकौंटट बजीरंग जाधव, शेती अधिकारी राहुल नागणे, उप शेती अधिकारी तोहीद शेख, ऊस पुरवठा अधिकारी दामोदर रेवे, प्रताप मोरे, सोमनाथ धावणे, मनोज होलम, अभिजित पवार,निलेश रणदिवे, चंद्रकांत राठोड, रणजीत पवार यांचे सह अधिकारी, कर्मचारी व ऊस उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.