सिद्धेश्वर संदेश चे संपादक रमाकांत साळुंखे शिव निर्णय चे संपादक अनिल शिराळकर डॉ. आंबेडकर नॅशनल फ्लोशीप अवार्ड पुरस्काराने सन्मानित

सिद्धेश्वर संदेश चे संपादक रमाकांत साळुंखे शिव निर्णय चे संपादक अनिल शिराळकर डॉ. आंबेडकर नॅशनल फ्लोशीप अवार्ड पुरस्काराने सन्मानित

सिद्धेश्वर संदेश चे संपादक रमाकांत साळुंखे शिव निर्णय चे संपादक अनिल शिराळकर डॉ. आंबेडकर नॅशनल फ्लोशीप अवार्ड पुरस्काराने सन्मानित

पत्रकारितेत ‘सिद्धेश्वर संदेश’चे संपादक रमाकांत साळुंखे व दैनिक ‘शिवनिर्णय’चे संपादक 

अनिल शिराळकर यांना दिल्लीत डॉ. आंबेडकर नॅशनल फेलोशिप अवॉर्ड पुरस्काराने सन्मानित

नवी दिल्ली (प्रतिनिधी) : पत्रकारितेच्या माध्यमातून दलितांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासह त्यांच्या उन्नतीसाठी कार करणारे‘सिद्धेश्वर संदेश’चे संपादक रमाकांत साळुंखे व दैनिक ‘शिवनिर्णय’चे संपादक अनिल शिराळकर यांना दिल्लीच्या भारतीय दलित साहित्य अकादमीच्यावतीने दिल्लीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर नॅशनल फेलोशिप पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 

 देशाच्या सर्व राज्यातील विविध जातीधर्मातील, भाषांमधून दलितांच्या उन्नतीसाठी काम करणारे दलित साहित्यकार, लेखक, पत्रकार, संपादक, समाजसेवी व्यक्तींचे 38 वे राष्ट्रीय दलित साहित्य संम्मेलनाचे आयोजन 11 व 12 डिसेंबर रोजी भारतीय दलित साहित्य अकादमीचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. सोहनपाल सुमनाक्षर यांनी झरोंदा येथील पंचशिल आश्रमात आयोजन केले होते. 

 यावेळी विविध सांस्कृतिक कार्यक्रमासह कवी संम्मेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या संम्मेलनात विविध क्षेत्रातील मान्यवरांनी दलितांच्या समस्यावर विचार व्यक्त केले. दोन दिवसीय संम्मेलनात डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, भगवान बुद्ध आणि सावित्रीबाई फुले यांच्या नावांने नॅशनल फेलोशिप अवॉर्ड पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मात्र देशातील अनेक वृत्तपत्राच्या संपादक आणि पत्रकारांना यावेळी विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. याचवेळी महाराष्ट्रातील साप्ताहिक ‘सिद्धेश्वर संदेश’चे संपादक रमाकांत साळुंखे व दैनिक ‘शिवनिर्णय’चे संपादक अनिल शिराळकर यांना दिल्लीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर नॅशनल फेलोशिप अवॉर्ड पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. देशाच्या सर्व राज्यातील विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळाची विविध फेलोशिप पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी सुमनाक्षर यांना साप्ताहिक ‘सिद्धेश्वर संदेश’ दिपावली अंक भेट देण्यात आला.

 38 व्या राष्ट्रीय दलित साहित्य संम्मेलनात विविध मान्यवरांना प्रस्तावावर चर्चा करून ठराव पारित करण्यात आले. शेवटी अकादमीचे राष्ट्रीय महासचिव जय सुमनाक्षर यांनी आभार मानले.

       पत्रकारितेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर नॅशनल फेलोशिप अवार्ड मिळाल्याबद्दल जिल्हा परिषदेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी अजयसिंह पवार, ऑल इंडिया पेन्शनवर असोसिएशनचे अध्यक्ष अशोक भूल महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद लिपीक वर्गीय कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष शालिक माऊलीकर, प्रदेश सरचिटणीस अशोक कासरळीकर, राज्य जिल्हा परिषद महिला परिचर महासंघाच्या प्रदेशाध्यक्ष मंगला मेश्राम, महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद आरोग्य कर्मचारी युनियनचे प्रदेशाध्यक्ष निर्मल पवार सोलापूर, जि.प. लिपीक वर्गीय कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष अविनाश गोडसे गोंदिया जि.प. कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष प्रल्हाद शहारे सोलापुर जि.प. कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष राजेश देशपांडे अ‍ॅड. प्रमोद शहा, अ‍ॅड नारायण रसाळकर, राज्य ग्रामसेवक युनियनचे राज्य सल्लागार लक्ष्मण गळगुंडे यांच्यासह जिल्हा परिषदेतील विविध संघटना, पदाधिकारी, कर्मचार्‍यांनी अभिनंदन केले.