पंढरपूर येथे सुवर्ण ज्वेलरी व्यवसाय व त्याचे मूल्यांकन या विषयांवर एक दिवशीय प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न
बाजारात मोठ्या प्रमाणावर फेक दागिने

पंढरपूर येथे सुवर्ण ज्वेलरी व्यवसाय व त्याचे मूल्यांकन या विषयांवर एक दिवशीय प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न
राज्यातील तज्ञ मान्यवर मंडळींकडून गोल्ड व्हॅल्यूअर्स यांना मार्गदर्शन : पुरुषोत्तम काळे
पंढरपूर दि.3 ऑगस्ट पंढरपूर येथे गोल्ड व्हॅल्यूअर्स असोसिएशन आणि इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने सुवर्ण ज्वेलरी व्यवसाय व त्याचे मूल्यांकन या एक दिवशीय प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन येथील श्रीराम मंगल कार्यालय येथे करण्यात आले होते.
या कार्यक्रमासाठी गोल्ड व्हॅल्यूअर्स असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. पुरुषोत्तम काळे, कार्याध्यक्ष डॉ. राजेंद्र दिंडोरकर, प्रशासकीय सचिव सतीश पितळे,उपाध्यक्ष चेतन राजापूरकर, सचिव संजय वाघ, सोलापूर जिल्हा अध्यक्ष संजय ढाळे, पंढरपूर तालुकाध्यक्ष महेश आराध्य, सोलापूर शहराध्यक्ष निलेश धाराशिवकर, सोलापूर शहर उपाध्यक्ष गिरीश शहाणे, राजाभाऊ वाईकर, कालिदास कांदळगावकर, प्रसाद कुमठेकर, समीर शहा, महावीर गांधी यांच्यासह राज्यभरातील गोल्डन व्हॅल्यूअर्स बांधव उपस्थित होते.या कार्यशाळेनंतर आयोजित पत्रकार परिषदेत गोल्ड व्हॅल्यूअर्स असोसिएशनचे अध्यक्ष पुरुषोत्तम काळे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी बोलताना काळे म्हणाले की बाजारात मोठ्या प्रमाणावर फेक दागिने आले आहे. बँकेत व इतर ठिकाणी हे दागिने तपासण्याची जबाबदारीचे आणि कठीण काम तोकड्या कमिशनवर गोल्ड व्हॅलीव्हर्स यांना करावे लागते. अनेक बँका, पतसंस्था सत्ताधारी नेते मंडळींच्या असल्याने अनेक वेळा सोन्याच्या फेक दागिन्यांबाबत व्हॅल्यूअर्सला जबाबदार धरले जाते.बॅंका, पतपेढी, पतसंस्था आणि इतर सर्वांचे नियम वेगवेगळे असल्याने काही व्हॅलीवर्स ना अशिक्षित असल्याने ते कळत नाहीत. फेक दागिने कळावेत याची सखोल माहिती मिळावी यासाठी या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले असून या कार्यशाळेत तज्ञ मान्यवरांकडून सहकारी बँका, सहकारी पतसंस्था व व्हॅल्युएशन करणाऱ्या सोनारांच्या समस्या या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. याचबरोबर असोसिएशनची वाटचाल व आगामी प्रोजेक्ट, प्रचलित सुवर्ण व्यवसायाची स्थिती, कोड ऑफ कंडक्टर व कायदेशीर बाबी, याचबरोबर जीएसटी बद्दल माहिती गोल्ड व्हॅल्यूअर्स यांना देण्यात आल्याचे काळे यांनी दिली.