शहीद मेजर कुणाल गोसावी यांचा ६ वा स्मृतिदिन साजरा

शहीद जवानांच्या कुटुंबातील सदस्यांचा सन्मान

शहीद मेजर कुणाल गोसावी यांचा ६ वा स्मृतिदिन साजरा

शहीद मेजर कुणाल गोसावी यांचा ६ वा स्मृतिदिन साजरा

पंढरपूर दिनांक 29 नोव्हेंबर भारत मातेचे थोर सुपुत्र शहीद मेजर कुणाल मुन्ना गिर गोसावी यांच्या सहाव्या गौरवशाली पुण्यस्मरणानिमित्त आज स्मारकास ब्रिगेडियर अरुण कुंडलकर सेना मेडल निवृत्त नितीन धार्मिक साहेब आयुक्त राज्य उत्पादन शुल्क सोलापूर अरुण फुगे साहेब पोलीस निरीक्षक पंढरपूर शहर पोलीस स्टेशन सी जे खिलारे प्राचार्य कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय पंढरपूर धनश्री तानाजी साळुंखे सरपंच वाखरी सोमनाथ शिवाजी पोरे उपसरपंच वाखरी कुंडलकर मॅडम यांच्या सर्वांच्या शुभहस्ते स्मारक पुष्पचक्र अर्पण करून पुढील कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली सदरच्या कार्यक्रमांमध्ये विविध जिल्ह्यातील शहीद जवानांच्या कुटुंबातील सदस्यांचा सन्मान करण्यात आला त्यामध्ये सुवर्णा कि दत्त सातारा प्रमिला जाधव सातारा प्रियंका मांढरे सातारा रेश्मा बाबर सांगोला कविता बनसोडे सोलापूर सुवर्णा डोईफोडे इंदापूर वैशाली चव्हाण सांगली स्वाती लोभे निलंगा अनिता लांडगे औसा शुभांगी चित्ते लातूर कविता जोंधळे कोल्हापूर शांता माळी करकम लता पाटील करवीर कोल्हापूर या शहीद कुटुंबीयांच्या सन्मान करण्यात आला मान्यवरांच्या उपस्थितीत सर्वांचा सन्मान करण्यात आला तसेच कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीताने करून नेशन फर्स्ट अकॅडमी येथील कुमारी फिजा मुजावर हिने देशभक्तीपर भाषण केले त्याचबरोबर रिधांन महेश गोसावी याचे भाषण झाले सर्व सन्माननीय प्रमुखांचे प्रमुखांचे मनोगत झाले त्या मनोगतामध्ये एनसीसी मधील विद्यार्थ्यांना विविध धडे दिले तसेच शहीद मेजर कुणाल गोसावी प्रतिष्ठानच्या वतीने शहीद मेजर कुणाल गोसावी प्रतिष्ठान पंढरपूर चे अध्यक्ष मुन्नागीर गोसावी यांनी आभार मानले तसेच हा कार्यक्रम यशस्वी पार पडण्यासाठीअमित गोसावी विजय गोसावी महेश म्हेत्रे योगेश डिंगरे  महेश गोसावी प्रतिष्ठानचे सर्व सन्माननीय सदस्य गोसावी कुटुंबीय यांनी मोलाचे सहकार्य केले सूत्र संचालन निलिमा गोसावी यांनी केले