पंढरपूर सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. गावडे यांची बदली.
श्री द.म गावडे यांची सोलापूर येथील सार्वजनिक बांधकाम विभाग क्र.१ या ठिकाणी बदली

पंढरपूर सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. गावडे यांची बदली.
पंढरपूर बुधवार दि.. 19 एप्रिल पंढरपूर येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्री द.म गावडे यांची सोलापूर येथील सार्वजनिक बांधकाम विभाग क्र.१ या ठिकाणी बदली करण्यात आली आहे.
पंढरपूर सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये त्यांनी उत्कृष्ट व चांगल्या प्रकारे काम केले असून शासन नियमाप्रमाणे त्यांना या ठिकाणी ३ वर्ष कार्यकाल पूर्ण झाला असल्याने त्यांची सोलापूर येथील सार्वजनिक बांधकाम विभाग क्र.१ या ठिकाणी कार्यकारी अभियंता पदी बदली झाली आहे.
पंढरपूर येथील सार्वजनिक बांधकाम विभागा अंतर्गत त्यांच्या कार्यकाळात अनेक पंढरपूर, मंगळवेढा सांगोला मध्ये येणारे आमदार फंड, खासदार फंड, विविध योजने अंतर्गत येणारे रस्त्ते शासकीय कार्यालये हे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत असणारे रस्ते चांगल्या दर्जाचे कामे करून घेतली आहेत. या अगोदर त्यांनी पंढरपूर येथील सार्वजनिक बांधकाम उपविभाग पंढरपूर या ठिकाणी उप अभियंता म्हणून सलग ४ वर्षे काम पाहिले होते. त्याच कामाची पोहच पावती म्हणून त्यांची थोड्या कालावधीतच कार्यकारी अभियंता पदी नियुक्ती झाली होती त्यानंतर पुन्हा पंढरपूर येथील सार्वजनिक बांधकाम विभागात कार्यकारी अभियंता म्हणून नियुक्ती झाली होती .
कार्यकारी अभियंता झाल्यानंतरही पंढरपूर मंगळवेढा सांगोला या ठिकाणी उत्कृष्ट व चांगल्या प्रकारे काम करून दाखवली आहेत. त्यामुळे पंढरपूर मंगळवेढा सांगोला येथील आजी माजी आमदार तसेच विविध पक्षाचे पदाधिकारी व विविध संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते यांना विश्वासात घेऊन सर्वाना योग्य ते मार्गदर्शन करून सर्वांना सहकार्य करीत आपला ३ वर्षाचा कार्यकाल पूर्ण केला असून सध्या सोलापूर येथे सार्वजनिक बांधकाम क्र.१ या ठिकाणी कार्यकारी अभियंता म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
सोलापूर येथील सार्वजनिक बांधकाम विभाग क्र१चा श्री गावडे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर प्रथम राज्य कंत्राटदार महासंघ , राज्य अभियंता संघटनेच्या वतीने इंजिनिअर श्री मिलिंद भोसले व त्यांचे सहकारी यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले आहे.