स्वाभिमानी माऊली पुरस्कार वितरण व दिव्यांग मातांचा सन्मान सोहळा संपन्न.

द्वितीय पुण्यस्मरणनिमित्त अशाच स्वाभिमानी मातांचा पुरस्कार सन्मान

स्वाभिमानी माऊली पुरस्कार वितरण व दिव्यांग मातांचा सन्मान सोहळा संपन्न.

स्वाभिमानी माऊली पुरस्कार वितरण व दिव्यांग मातांचा सन्मान सोहळा संपन्न.

मिरजगाव ता. कर्जत जि. अहमदनगर येथील श्री साई बालाजी प्रतिष्ठानच्या वतीने मातोश्री कै. कौशल्याबाई भानुदास गोरे यांच्या द्वितीय पुण्यतिथी निमित्त समाजातील कष्टाने जिद्दीने व खडतर परिश्रम घेऊन बिकट परिस्थितीमध्ये न डगमगता प्रचंड मेहनतीने आपल्या मुलाला शिक्षण देऊन मोठे अधिकारी आदर्श नागरिक घडवणाऱ्या मातांचा कै. कौशल्याबाई भानुदास गोरे स्वाभिमानी माऊली पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. अंध माता व भगिनिनी आपल्या अंधत्वाचे भांडवल न करता ज्ञानाच्या प्रकाशाच्या साह्याने समाजात आपले अस्तित्व निर्माण केले. उच्च शिक्षण घेऊन आपली एक प्रतिमा निर्माण केली अशा 10 दिव्यांग अंध मातांचा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी राष्ट्रीय कीर्तनकार व समाज प्रबोधनकार ज्ञानेश्वर माऊली वाबळे आळंदी यांचे जाहीर हरिकीर्तन झाले. त्यांचे हस्ते स्वाभिमानी पुरस्कार देऊन श्रीमती द्रोपदा सुभाष काळदाते चिंचोली काळदास ता. कर्जत रुक्मिणी देवदास पांडुळे पिंपरी घुमरी ता. आष्टी लक्ष्मीबाई राजेंद्र धांडे प कै .ताराबाई अंबादास म्हेत्रे यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. ताराबाई अंबादास म्हेत्रे यांना मरणोत्तर हा पुरस्कार देण्यात आला. पुरस्कर सोहळा प्रसंगी सद्गुरु उद्योग समूहाचे अध्यक्ष श्री शंकरशेठ नेवसे जी प सदस्य श्री अशोकराव खेडकर श्री गारठी सर विजू पाटील आनारसे. अमोल रासकर अक्षय व्यवहारे भाजपाचे ज्येष्ठ नेते डॉ. रमेशचंद्र झरकर श्री परमवीर पांडूळे सरपंच नितीन दादा खेतमाळस सदाशिव शिंदे डॉ. श्रीराम धस लहुजी वतारे विजय पवार मिनीनाथ गोरे डॉ. पंढरीनाथ गोरे डॉक. शिवाजी पाबळे डॉ. सुभाष सूर्यवंशी श्री रमेशआप्पा खेतमाळस. संजय पवार पत्रकार बबनराव म्हस्के जिल्हाध्यक्ष प्रहार संघटना नगर. साईभक्त हरिभाऊ प्रक्षाळे पत्रकार पंढरपूर आदी मान्यवर उपस्थित होते.

याप्रसंगी दिव्यांग अंध माताना10 शाल श्रीफळ व साडी देऊन सन्मानित करण्यात आले. आपल्या आईनेअत्यंत खडतर परिस्थितीमध्ये प्रचंड कष्ट करून आपल्याला मोठे केले शिक्षण दिले म्हणून तिच्या द्वितीय पुण्यस्मरणनिमित्त अशाच स्वाभिमानी मातांचा पुरस्कार सन्मान करण्याचा हेतू आहे की समाजात अशा अनेक स्त्रियानी प्रेरणा घेऊन आपली मुले घडवावीत हा हेतू असल्याचे हभप श्री राजेंद्र गोरे सर यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सखाराम राजळे सर व श्री संदीप केदारी यांनी केले आभार श्री मिनीनाथ गोरे सर यांनी मानले.