पंढरपूर नगरपरिषदेच्या वतीने ध्वजारोहण व शहीद सैनिक व स्वातंत्र्य सैनिक यांच्या वारसांचा सन्मान, शिलाफलकाचे उद्घाटनज्ज्जी

शांताबाई जगन्नाथ चंदनशिवे यांच्या शुभ हस्ते

पंढरपूर नगरपरिषदेच्या वतीने ध्वजारोहण व शहीद सैनिक व स्वातंत्र्य सैनिक यांच्या वारसांचा सन्मान, शिलाफलकाचे उद्घाटनज्ज्जी

आजादी का अमृत महोत्सव मेरी मिट्टी मेरा देश या उपक्रमांतर्गत पंढरपूर नगरपरिषदेच्या वतीने ध्वजारोहण व शहीद सैनिक व स्वातंत्र्य सैनिक यांच्या वारसांचा सन्मान, शिलाफलकाचे उद्घाटन

पंढरपूर नगर परिषदेच्या वतीने आजादी का अमृत महोत्सव मेरी मिट्टी मेरा देश या उपक्रमांतर्गत स्वतंत्र सैनिक वारस शांताबाई जगन्नाथ चंदनशिवे यांच्या शुभ हस्ते मुख्याधिकारी अरविंद माळी, तहसीलदार सुशील बेल्हेकर, गट विकास अधिकारी प्रशांत काळे, उपमुख्याधिकारी सुनील वाळूजकर यांच्या प्रमुख उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आले तसेच शहीद सैनिक व स्वातंत्र्य सैनिक वारस यांच्या शुभहस्ते शिलाफलकाचे उद्घाटन करून शहीद भगतसिंग यांच्या पुतळ्याचे व महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले याप्रसंगी उपस्थित असलेले स्वातंत्र्यसैनिक व शहीद सैनिक यांचे वारस शांताबाई जगन्नाथ चंदनशिवे, शिलावती कृष्णा गंगथडे, कमल भाऊसाहेब डोंबे,स्वातंत्र्यसैनिक वारसदार संघटनेचे अध्यक्ष दीपक भोसले, मुन्नागीर गोसावी, मिलिंद आढवळकर, प्रकाश भादुले, आनंद खपाले, कुमार कोरे, पवन देवकर, प्रकाश मोरे, गुंडेवार, विलास भादुले यांचा सन्मान व सत्कार मुख्याधिकारी अरविंद माळी, तहसीलदार सुशील बेल्हेकर, गट विकास अधिकारी प्रशांत काळे यांच्या शुभहस्ते करण्यात आला यावेळी दीपक भोसले, प्रकाश भादुले यांनी मनोगत व्यक्त करून स्वातंत्र्यसैनिक यांच्यामुळे देशाला स्वातंत्र्य मिळाले व देशाचे स्वातंत्र्य टिकवण्याचं काम सैनिक करत असल्याचे सांगून हुतात्मा स्मारक येथे स्वातंत्र्यसैनिक व शहीद सैनिकांचे इतिहास पुढील पिढीच्या माहितीसाठी लावावा अशी मागणी या निमित्ताने केली व नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अरविंद माळी यांनी आमचा सन्मान व सत्कार केला त्याबद्दल नगर परिषदेचे आभार व्यक्त केले यावेळी मुख्याधिकारी अरविंद माळी यांनी शासन राबवीत असलेल्या या उपक्रमाची माहिती यावेळी दिली या कार्यक्रमास नगर अभियंता नेताजी पवार, कर अधिकारी सुप्रिया शिंदे, कार्यालय अधीक्षक जांनबा कांबळे, कामगार संघटनेचे अध्यक्ष महादेव आदापुरे, आरोग्य अधिकारी शरद वाघमारे, नागनाथ तोडकर, दर्शन वेळापुरे, चेतन चव्हाण, चिदानंद सर्वगोड, अनिल अभंगराव, संतोष कसबे,तनुजा सीताफ, सुहास झिंगे,सोमेश धट, राजकुमार सपाटे, पराग डोंगरे, प्रीतम येळे, राजकुमार काळे, संभाजी देवकर, जयंत पवार, कृष्णात जगताप, योगेश काळे, अभय आराध्ये,संजय माने,भूषण घोडके हे उपस्थित होते