भटुंबरे ग्रामस्थांकडून चेअरमन श्री. प्रशांतराव परिचारक यांचा सन्मान.

सोलापूर जिल्ह्यामध्ये अग्रेसर असणारा श्री पांडुरंग सहकारी साखर कारखाना

भटुंबरे ग्रामस्थांकडून चेअरमन श्री. प्रशांतराव परिचारक यांचा सन्मान.

भटुंबरे ग्रामस्थांकडून चेअरमन श्री. प्रशांतराव परिचारक यांचा सन्मान

पंढरपूर दिनांक 28 सप्टेंबर.महाराष्ट्रत आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये अग्रेसर असणारा श्री पांडुरंग सहकारी साखर कारखाना श्रीपुर तालुका माळशिरस एक नंबर साखर कारखाना म्हणून महाराष्ट्र मध्ये ओळखला जातो. श्रीमंत योगी स्वर्गीय श्री सुधाकरपंत परिचारक सहकार क्षेत्रातील डॉक्टर व शिरोमणी म्हणून ओळखले जात त्यांचाच वारसा म्हणून साखर उद्योगात उत्तम प्रकारे प्रगती करणारे चेअरमन मा. श्री प्रशांतराव परिचारक यांचा डेक्कन शुगर्स टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशन ऑफ इंडिया पुणे यांच्यावतीने देण्यात येणारा साखर उद्योग गौरव पुरस्कार 20 22 पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सोलापूर जिल्ह्याचे माजी आमदार पांडुरंग परिवाराचे प्रमुख प्रशांत मालक परिचारक यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा सत्कार भटुंबरे ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आला. श्री पांडुरंग सहकारी साखर कारखाना हा शेतकरी व सभासदांना सोलापूर जिल्ह्यातील कारखान्यापैकी सर्वाधिक ऊसाला दर देत आहे त्यामुळे तालुक्यातील ऊस शेतकरी व सभासदांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. कारखान्याचे चेअरमन श्री प्रशांतराव परिचारक यांनी उत्कृष्ट प्रकारे कारखाना चालवून कारखान्यास अनेक सन्मानपत्र प्राप्त केल्याने पंढरपूर तालुक्यातील शेतकरी सभासद यांच्याकडून गावोगावी सत्कार सन्मान केला जात आहे.

यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक फंची बापू शिंदे भटुंबरे चे माजी सरपंच भारत आप्पा शेंबडे तंटामुक्त समितीचे अध्यक्ष भीमराव तात्या शिंदे भटुंबरे विकास सेवा सोसायटीचे चेअरमन पंडित दादा शेंबडे पत्रकार संघाचे अध्यक्ष हरिभाऊ प्रक्षाळे शिवाजी भाऊ सलगर मोहन भाऊ खांडेकर संजय येडगे अजय नाना खांडेकर किशोर तावसकर अण्णा येडगे पोलीस पाटील अनिल पाखरे अर्जुन लोखंडे सावळाराम शेंबडे नवनाथ खांडेकर निलेश शिंदे लखन शेंबडे यांच्यासह भटुंबरे येथील ग्रामस्थ उपस्थित होते