साक्षी सरगर या धावपटू मुलींच्या १८ वर्ष वयोगटातील २००० मिटर स्टिपल चेस स्पर्धेत रौप्य पदक

साक्षी सरगर या धावपटू मुलींच्या १८ वर्ष वयोगटातील २००० मिटर स्टिपल चेस स्पर्धेत रौप्य पदक

साक्षी सरगर या धावपटू मुलींच्या १८ वर्ष वयोगटातील २००० मिटर स्टिपल चेस स्पर्धेत रौप्य पदक

*मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ येथे सुरू असलेल्या १७ व्या नॅशनल चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये १२ वीत शिकणाऱ्या पंढरपूर येथिल अजिंक्य स्पोर्ट अकॅडमीची विद्यार्थीनी साक्षी सरगर या धावपटू मुलींच्या १८ वर्ष वयोगटातील २००० मिटर स्टिपल चेस स्पर्धेत रौप्य पदक मिळवले तिने हे अंतर ७ मिनिटे २८:३३ सेकंदात पार केले असून तिची आशियाई स्पर्धेतसाठी भारतीय संघाकडून निवड निश्चित झाली आहे साक्षी ही एक सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील मुलगी आहे तर तिने आत्मविश्वास व जिद्द या जोरावर यशाची उत्तुंग भरारी घेतली आहे सध्या ती पंढरपूर येथिल कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय व पंतनगर येथिल मैदानावर प्रशिक्षक चेतन धनवडे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत आहे साक्षी हिचे वडील दुसर्‍याच्या शेतामध्ये मोलमजूरी करून परिवाराचा उदरनिर्वाह करत आहेत त्यामुळे तिला पुढील आशियाई स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आर्थिक मदतीची खूप गरज आहे तर सोलापूर जिल्ह्यातील इतर सर्व तालुक्यांमध्ये ४०० मिटरचे मैदान करून तेथील खेळाडूंची शासणाने प्रॅक्टिसची सोय केली परंतु पंढरपूरमध्ये ४०० मिटरचे मैदान नसल्याने खेळाडूंची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत आहे तरीही परिस्थितीवर मात करत कोणत्याही मुबलक सुविधा नसताना स्टेट तसेच नॅशनलचे खेळाडू पंढरपूरने दिले असूनही प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होताना दिसुन येत आहे तस पाहिले तर खर महाराष्ट्रा मधिल पहिले क्रिडा संकुल हे पंढरपूरमध्ये झाल परंतु ते अयोग्य जागी तर झालच पण तेही ४०० मिटरचे नसून ३०० मिटरचे केल्याने त्या क्रिडांगणाची अवस्था असून अडचण आणि नसून खोळंबा या मराठी उक्ती प्रमाणे झाली आहे अतातरी निदान खेळाडूंच्या या ४०० मिटर ट्रॅक करून देण्याच्या मागणीकडे सोलापूर क्रिडा जिल्हाधिकारी यांनी लक्ष देण्याची मागणी खेळाडूंमधून होत आहे*