आषाढी देवशयनी एकादशी सोहळ्यासाठी  १४लाख भाविकांनी पंढरी नगरी फुलली

लाखो भाविकांनी चंद्रभागेचे स्नान तीर्थ आनंद घेतला

आषाढी देवशयनी एकादशी सोहळ्यासाठी  १४लाख भाविकांनी पंढरी नगरी फुलली

आषाढी देवशयनी एकादशी सोहळ्यासाठी  १४लाख भाविकांनी पंढरी नगरी फुलली

गुरुवार दिनांक 29 जून (हरिभाऊ प्रक्षाळे) पंढरपूर

धन्य आजि दिन झाले संतांचे दर्शन || अनंत जन्माचा शीण गेला || 

या संत एकनाथ महाराजांच्या अभंग रचनेतील भावरुपपणा डोळ्यात साठवून लाखो वारकरी भाविकांच्या उपस्थितीत आषाढी एकादशीचा सोहळा भक्तीमय वातावरणात साजरा झाला. आषाढीच्या देवशयनी एकादशीसाठी सुमारे 14 लाख भाविकांनी पंढरी नगरी फुलून गेली होती. राज्यातील कांहीं भागांत काल बुधवारपासून पाऊस सुरू असल्याने पंढरीत आषाढी यात्रेसाठी आलेल्या लाखो भाविकांनी सावळ्या विठुरायाचा आजच निरोप घेत आपले गांव गाडीने पसंत केले असल्याचे चित्र दिसून येत होते. 

सावळ्या विठ्ठल रुक्मिणीच्या पदस्पर्श दर्शनाची रांग आज फक्त 6 पत्राशेडमधूनच सुरू होती. प्रतिवर्षी एकादशीच्या दिवशी दर्शन रांग गोपाळपूर गावाच्या पुढे सरकली रोडवर सुरू असते. पाऊसाने दडी मारल्यामुळेही लाखो वारकरी भाविकांनी आपल्या घराण्याची नित्यनेमाने सुरू असणारी वारीची परंपरा पूर्ण करून गाव गाठणे पसंत केल्याची भावना वारकऱ्यांनी व्यक्त केली. विठ्ठल रुक्मिणी पदस्पर्श दर्शनासाठी सुमारे 16-18 तासांचा अवधी लागत आहे. नेमिची येतो मग पावसाळा या म्हणी प्रमाणे विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्यावतीने भाविकांना फराळाचे वाटप करण्यात येणार असल्याचे जाहीर केले होते मात्र दर्शन रांगेत फराळ वाटपाचा स्टॉल कोठेही दिसला नाही. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था मात्र दिसून आली त्याबद्दल भाविकांमधून समाधान व्यक्त केले जात होते. या दर्शन रांगेत जळगावच्या भाविकांच्या वतीने मोफत फराळ वाटप मात्र मनोभावे केले जात होते.

 देवयानी एकादशी सोहळ्यासाठी आलेल्या लाखो भाविकांनी पहाटेपासूनच चंद्रभागा वाळवंटात पवित्र स्नानासाठी तोबा गर्दी केली असल्याचे चित्र वाळवंटात पहायला मिळत होते. नगरप्रदक्षिणा मार्गावर वारकरी भाविकांची दाटी झाली असल्याने भाविक आपोआप पुढे पुढे ढकलले जात होते. नामदेव पायरीचे दर्शन आणि विठ्ठल रुक्मिणी मंदिर कळसाचे दर्शनावर समाधान मानून आपली वारी पोहचली असल्याचे समाधान मानणाऱ्या भाविकांना मात्र किरकोळ धक्का बुक्की, चेंगराचेंगरी झाल्याचे द्रौपदी जगताप या दौंड तालुक्यातील केडगाव येथील महिला झाल्याचा अनुभव सांगितला.

एस टी महामंडळाने आषाढी यात्रेसाठी सुमारे 5 हजार जादा फेऱ्यांची व्यवस्था केली होती. वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून पोलिस प्रशासनाच्या नियोजनानुसार पंढरपूर पासून 4-5 कि. मी. लांब अंतरावर तात्पुरते यात्रा बसस्थानक उभारले असल्याने वारकरी भाविकांना जेवढा प्रवास खर्च येतो त्यापेक्षा जास्त म्हणजे 400-500 रुपये रिक्षा भाडे प्रतिमाणसी आकारले जात असल्याने वारकरी भाविकांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात होती. एस टी महामंडळाने मिनीबसच्या माध्यमातून तात्पुरते बसस्थानकाकडे जाण्यासाठी पुढील यात्रेसाठी तरी व्यवस्था करावी अशी अपेक्षा भाविकांमधून व्यक्त केली जात आहे.