मंगळवेढा तालुक्यात 21 ग्रामपंचायतीवर मा.आ. प्रशांतराव परिचारक प्रणित समविचारी गटाची सत्ता.

मंगळवेढा तालुक्यातील अनेक गावे परिचरक गटाकडे

मंगळवेढा तालुक्यात 21 ग्रामपंचायतीवर मा.आ. प्रशांतराव परिचारक प्रणित  समविचारी गटाची सत्ता.

मंगळवेढा तालुक्यातील आज झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये मानेवाडी, रेवेवाडी,लोणार,पडोळकरवाडी,जालिहाळ सिध्दनकेरी, लक्ष्मीदहीवडी,आंधळगांव,जंगलगी, चिक्कलगी, खडकी,भाळवणी,निंबोणी,शेलेवाडी,अकोला, देगांव, रड्डे, डिकसळ, शिरसी, खुपसंगी, जुनोनी व बिनविरोध ब्रम्हपुरी या २१ ग्रामपंचायतीवरती मा.आ.प्रशांत परिचारक प्रणित समविचारी गटाचा सत्ता आली असल्याचे सांगण्यात आले.

नवनिर्वाचित सरपंच व ग्रा.पं.सदस्यांचा सत्कार मा.आ.प्रशांत परिचारक संपर्क कार्यालयासमोर संत दामाजी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन शिवानंद पाटील,व्हाईस चेअरमन तानाजी खरात,जिल्हा नियोजन मंडळाचे माजी सदस्य युन्नुस शेख,दामाजी शुगरचे संचालक औदुंबर वाडदेकर,बसवराज पाटील,सुरेश कोळेकर,राजेंद्र पाटील, गौरीशंकर बुरकुल, महादेव लुगडे,गोपाळ भगरे, रेवणसिध्द लिगाडे आदींच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी माजी पं.स.माजी उपसभापती काशिनाथ पाटील,दामाजी शुगरचे माजी संचालक भारत पाटील, मा.आ.प्रशांतरावजी परिचारक युवा मंचचे अध्यक्ष बबलु सुतार, माधवानंद आकळे,दामाजी शुगरचे संचालक गौडाप्पा बिराजदार,बाबासो पडोळकर,दामाजी शुगरचे संचालक दिगंबर भाकरे, माजी.जि.प. सदस्य शिवाजीराव नागणे, महादेव माळी, काशिनाथ पाटील,मंगळवेढा सह.सुतगिरणीचे संचालक पप्पु स्वामी,दिलीप राजमाने,अनिल पाटील,प्रकाश जुंदळे,श्रीकांत साळे,सिध्देश्वर मेटकरी,लक्ष्मण आमुंगे,शिवाजी वाघमोडे, शिवाजी पडोळकर,तानाजी कांबळे,सहदेव लवटे, भाऊसो रेवे,शशिकांत कस्तुरे,सिदमल चौगुले,महासिद्ध चौगुले,नितीन पाटील,रामभाऊ माळी,जगु इंगळे,मारुती माळी, दिपक चव्हाण, सचिन चौगुले,लक्ष्मण गायकवाड,पांडुरंग चौगुले,संजयसिंग रजपुत,अशोक जाधव यांच्यासह नवनिर्वाचित सरपंच,ग्रा.पं.सदस्य व कार्यकर्ते उपस्थित होते.