ईश्वर वठार मध्ये ३५ वर्षांच्या सत्तेला सुरुंग!

माऊली हळणवर यांच्या नेतृत्वाखाली संत बाळूमामा ग्रामविकास परिवर्तन पॅनल

ईश्वर वठार मध्ये ३५ वर्षांच्या सत्तेला सुरुंग!

ईश्वर वठार मध्ये ३५ वर्षांच्या सत्तेला सुरुंग!

माऊली हळणवर यांनी फिरविली भाकरी ; माजी जि.प.सदस्याला होम पीचवर चारली धुळ

पंढरपूर - जिल्ह्यातील ग्रामपंचायतच्या निवडणूक रणधुमाळीत पंढरपूर तालुक्यातील ईश्वर वठार ग्रामपंचायत अतिशय प्रतिष्ठेची असलेल्या निवडणूक देखील चुरशीची होती आणि झाली. भाजप किसान मोर्चाचे प्रदेश सचिव माऊली हळणवर यांच्या नेतृत्वाखाली संत बाळूमामा ग्रामविकास परिवर्तन पॅनल तयार झालं. इकडे माजी जि.प.सदस्य सुभाष माने यांच्या गटाची मागील ३५ वर्ष सत्ताधारी असलेल्या गटाने पॅनल उभे करत रणशिंग फुंकले. मात्र संत बाळूमामा परिवर्तन आघाडी सुरुवातीपासून यांचे पारडे जड होते. अनेक वर्षांपासून मा.पंचायत समिती सभापती वामन माने व मा.जि.प.सदस्य सुभाष यांनी ईश्वर वठार ग्रामपंचायतीव झेंडा फडकवला होता. त्यामुळे सत्ताधारी गटाला सुरुंग लावणे अवघड होते. मात्र पँनल प्रमुख माऊली हळणवर यांच्या पाठीवर मा.आ.प्रशांतराव परिचारक व आ.गोपिचंद पडळकरांचा ठेवलेला हात यामुळे मागील ३५ वर्षांपासूनच्या सत्तेला सुरुंग लावत संत बाळूमामा परिवर्तन आघाडीने ४ सदस्यांसह सरपंच पदी नारायण देशमुख यांची २९३ एवढ्या बहुमतानी सत्ता हस्तगत करत माजी.जिल्हा परिषद सदस्यांला आपल्या होम पिचवर धुळ चारत पायउतार केले.तालुक्यातील अतिशय प्रतिष्ठेची म्हणून ओळखल्या गेलेल्या व संवेदनशील असणाऱ्या ईश्वर वठार ग्रामपंचायत निवडणुकीत संत बाळूमामा परिवर्तन आघाडीने ४ सदस्यांसह सरपंच पदी मिळविले तर ३ सदस्यांचा निसटता पराभव झाला.विजयी उमेदवारांमध्ये विजय आण्णासो मेकटरी.लक्ष्मी सुदर्शन पांढरे, रंजना बाळासाहेब खांडेकर, रूक्मीणी अर्जुन घोडके हे चा सदस्य विजयी झाले तर माने गटाचे ३सदस्य विजयी झाले.

हि ग्रामपंचायत धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी झाली होती.यामध्ये गावातील आमच्या संतबाळुमामा परिवर्तन आघाडीचे कार्यकर्ते यांनी प्रामाणिक पणे साथ दिल्याने हा विजय झाला आहे. अशी माहिती रासपचे पंकज देवकते यांनी दिली.यावेळी प्रा.सुखदेव धुपे,मा.सरपंच नागनाथ हळणवर, शिवसेनेचे महावीर देशमुख,सदाशिव मेकटरी, ज्ञानेश्वर गुंडगे,युवराज पाटील, अर्जुन घोडके, नानासाहेब चौगुले, रविंद्र ठवरे आदी सह नुतन ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.