पंढरपूर तालुक्यातील ग्रामीण भागात डेंगू सदृश्य रुग्ण सापडले.

ग्रामीण भागातील गावांमध्ये डेंगू आजार साथीने डोके वर काढले

पंढरपूर तालुक्यातील ग्रामीण भागात डेंगू सदृश्य रुग्ण सापडले.

पंढरपूर तालुक्यातील ग्रामीण भागात डेंगू सदृश्य रुग्ण सापडले

पंढरपूर दिनांक 28 सप्टेंबर संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये तसेच सोलापूर जिल्ह्यामध्ये गेल्या दोन ते तीन महिन्यात सतत पडत असलेल्या पावसामुळे आणि ग्रामीण भागातील रस्त्यावर असणारे मोठमोठे खड्डे त्यामध्ये साचलेले पावसाचे पाणी यामुळे संपूर्ण पंढरपूर तालुक्यातील काही ग्रामीण भागातील गावांमध्ये डेंगू आजार साथीने डोके वर काढले असून पंढरपूर तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये डेंगू सदृश्य आजाराचे रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे डेंगू साथीचा आजार रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायतिने फॉग मशीन द्वारे औषधाची फवारणी करून डासाचा वाढणारा प्रदुर्भाव थांबवावा यासाठी अनेक गावातील नागरिकांची औषध फवारणी करण्याची मागणी होत आहे.

सध्या पंढरपूर तालुक्यासह पंढरपूर शहरांमध्ये ही अनेक डेंगू सदृश्य आजाराचे रुग्ण सापडले आहेत. सतत उजनी धरण परिसरात पाऊस पडल्याने भीमा नदीला महापूर ही येऊन गेला आहे त्यामुळे नदीकाठच्या गावांना पुराच्या पाण्यामध्ये वाहून आलेल्या घाणी मुळे दुर्गंधी आणि डास मच्छर चा प्रादुर्भाव अधिक प्रमाणात वाढला आहे. भीमा नदीच्या पाण्यावर अनेक नदीकाठच्या गावे पिण्यासाठी पाण्याचा वापर केला जातो त्यामुळे ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याच्या टाकीमध्ये नेहमीप्रमाणे पावडर टाकण्यात यावी अशी ही मागणी ग्रामस्थातून केली जात आहे.

ग्रामीण भागातील डेंगू सारख्या साथीच्या आजार रोखण्यासाठी पंढरपूर पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी यांना संपर्क साधून विचारणा केले असता त्यांनी येत्या 28 सप्टेंबर रोजी ग्रामीण भागातील आरोग्य विषयक आणि डेंगू आजार रोखण्यासाठी पंढरपूर पंचायत समिती येथे जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या समवेत ग्रामपंचायत ग्रामसेवक यांची बैठक बोलावली आहे अशी माहिती पंढरपूरचे गट विकास अधिकारी श्री काळे यांनी माहिती दिली.