जिल्ह्यातील ग्रामीण भागातील स्मशानभूमीसाठी प्रस्ताव पाठवा.

जिल्हा परिषद सोलापूर यांचेमार्फत जिल्हाधिकार्यालय सोलापूर यांच्याकडे सादर करण्याचे आवाहन

जिल्ह्यातील ग्रामीण भागातील स्मशानभूमीसाठी प्रस्ताव पाठवा.

जिल्ह्यातील ग्रामीण भागातील स्मशानभूमीसाठी प्रस्ताव पाठवा जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर

पंढरपूर दिनांक 11 सप्टेंबर ग्रामीण भागातील स्मशानभूमी दपन भूमी नसलेल्या गावांनी स्थानिक गाव पातळीवर शासकीय जागा उपलब्ध असल्यास जागा मागणीसाठी संबंधित ग्रामपंचायतीने ठराव करावा. शिवाय जागेला पोहच रस्ता आहे याची खात्री करून मोजणी नकाशासह अ ब क ड परिशिष्टात जागा मागणी प्रस्ताव मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सोलापूर यांचेमार्फत जिल्हाधिकार्यालय सोलापूर यांच्याकडे सादर करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी केले आहे. गेल्या महिन्यात पंढरपूर तालुक्यातील मौजे चिंचोली भोसे, नेपतगाव , मेंढापूर येथील स्मशानभूमी संदर्भात साई सम्राट न्यूज माध्यमातून आम्ही जिल्हाधिकारी यांच्यासह विविध अधिकाऱ्यांना पंढरपूर तालुक्यातील स्मशानभूमीचा प्रश्न बऱ्याच गावातील अत्यंत गैरसोय आणि हलाकीचा असल्याचे साई सम्राट न्युज मधून बातमी प्रसिद्ध करण्यात आली होती याच बातमीची दखल घेत सोलापूर जिल्हाधिकारी श्री मिलिंद शंभरकर यांनी सोलापूर जिल्ह्यातील पोलीस अधिकारी तहसीलदार गट विकास अधिकारी यांच्याशी ऑनलाईन द्वारे बैठक घेण्यात आली त्यावेळी ग्रामीण भागातील स्मशानभूमीचे प्रस्ताव तत्काळ सादर करावे अशा सूचना दिल्या.

 जिल्ह्यातील दफन/ स्मशानभूमी याकरिता पोहच रस्ता सोयी सुविधा याबाबत जिल्हाधिकारी श्री मिलिंद शंभरकर यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाईन व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे बैठक झाली यावेळी ते बोलत होते. बैठकीसाठी निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार अतिरिक्त पोलीस अधीक्षक हिमंत जाधव ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी इशाधीन शेळकंदे तर ऑनलाईन द्वारे सर्व तहसीलदार सर्व पोलीस स्टेशनचे वरिष्ठ अधिकारी सर्व गटविकास अधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी सांगितले की ज्या गावात दहन दफनभूमीसाठी शासकीय जागा उपलब्ध नाही अशा गावात खाजगी व्यक्तीकडून दानपत्र किंवा बक्षीस पत्र देण्यास कोणी तयार असल्यास तसे दानपत्र ग्रामपंचायतीच्या नावे घ्यावे. कोणी खाजगी व्यक्ती दानपत्र करण्यास तयार नसल्यास जागा निश्चित करून भूसंपादन करून जागा मिळणे बाबतचा प्रस्ताव मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्फत जिल्हा नियोजन कार्यालयास सादर करावा.

दहन भूमीसाठी शासकीय जागा देण्याची तरतूद आहे यामध्ये हिंदू समाजातील सर्व जातीच्या लोकांना हिंदू धर्मासाठी असलेल्या दहन भूमीचा वापर करता येईल. दहन दफनभूमीसाठी रस्त्याबाबतचे प्रश्न मामलेदार कोर्ट ऍक्ट मधील तरतुदी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 143 मधील तरतुदी तर महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमातील तरतुदीनुसार त्या त्या यंत्रणेने सोडवावेत त्यासाठी पोलीस विभाग ग्रामस्तरीय तंटामुक्त समिती यांची मदत घेऊन कार्यवाही करावी असेही जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी सांगितले. दहन दफनभूमीसाठी शासकीय जमीन मागणी प्रस्तावासाठी विनामूल्य शासकीय जमिनीची मोजणी ही संबंधित अधीक्षक भूमी अभिलेख यांनी करावी अशा सूचनाही त्यांनी दिल्या ग्रामीण पोलिसांनी जिल्ह्यातील 22 पोलीस ठाणे अंतर्गत येणाऱ्या प्रत्येक गावाचे सर्वेक्षण करून 30 गावातील स्मशानभूमीसाठी रस्ते नाहीत 89 गावाना स्मशानभूमी तर60 गावातील स्मशानभूमी बाबत वाद सुरू असल्याचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालय सादर केला होता. याबाबत संबंधित पोलीस ठाण्याचे अधिकारी तहसीलदार व गट विकास अधिकारी यांनी एकत्रित स्थळ पाहणी केली होती. त्यानुसार जिल्हा परिषदेने 118 गावातील अडचणी सोडवून दफनभूमीचे प्रश्न मार्गी लावल्याची माहिती देण्यात आली.