*माणुसकी जपणारे व्यक्तीमत्व - वसंत नाना देशमुख*

आदरणीय वसंतनाना देशमुख यांचा आज जन्मदिवस.

*माणुसकी जपणारे व्यक्तीमत्व - वसंत नाना देशमुख*
*माणुसकी जपणारे व्यक्तीमत्व - वसंत नाना देशमुख*

*माणुसकी जपणारे व्यक्तीमत्व - वसंत नाना देशमुख*

????ज्याची बाग फुलून आली,

त्यांनी दोन फुले द्यावीत,

ज्यांचे सूर जुळून आलेत,

त्यांनी दोन गाणी द्यावीत,

आभाळाएवढी ज्यांची उंची,

त्यांनी थोडे खाली यावे ,

मातीत ज्यांचे जन्म मळले,

त्यांना थोडे उचलून घ्यावे???? 

 या दत्ता हलसगीकर यांच्या कवितेतील ओळी ज्यांना आज तंतोतंत लागू होतात,ज्यांचे दातृत्व , कर्तृत्व, नेतृत्व व श्रेष्ठत्व व्यापक आहे, सामाजिक कार्याचा जलकुंभ वाहून नेणारे विश्वासू कार्यक्षम मायमाऊली जणू कावडच असणारे ' पांडुरंग परिवाराचे सर्वेसर्वा ' सर्व समाजातील कार्यकर्त्यांना अगदी डाळींबाच्या दाण्यासारखे आपल्या आचार , विचार व कृतीने एकत्र आणून , थोर महापुरुषांच्या विचारांचा रथ न थकता अहोरात्र ओढून त्यांच्या विचारांची मशाल कायम पेटती ठेवून कार्यकर्त्यांमध्ये परिवर्तनवादी विचारांची अक्षय उर्जा भरणारे , प्रचंड उर्जा , कामाचा ध्यास , यशाची ध्यानधारणा आणि भविष्याचा वेध घेऊन सतत सर्व जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी सकारात्मक विचाराने वाटचाल करणारे कल्पकता , बुद्धिमत्ता , आणि वाक्चातुर्य या त्रिसूत्रीच्या बळावर राजकीय क्षेत्रात नावलौकिक केलेले उर्जाशील व्यक्तिमत्त्व , आमचे प्रेरणास्थान, संवेदनशील स्वभावाचे, विनयशील , हसतमुख व अभ्यासू व्यक्तीमत्त्व असणारे , पंढरपूर पंचायत समितीचे माजी सभापती, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाचे सिनेट सदस्य, सोलापूर जिल्हा परिषद सदस्य, पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे व्हा.चेअरमन आदरणीय वसंतनाना देशमुख यांचा आज जन्मदिवस.

    सोलापूर जिल्ह्यातील राजकारणात ज्यांचे नाव आदराने घेतले जाते ते म्हणजे कासेगाव पंचक्रोशीच्या विकासाचा महामेरू आदरणीय वसंत नाना देशमुख होय. नाना म्हणजेच विश्वास,नाना म्हणजेच एकनिष्ठा, नाना म्हणजेच एक वचनी तत्त्वाने चालणारे, नाना म्हणजेच गोरगरिबांचा आधार,नाना म्हणजेच मायेचा पदर, नाना म्हणजे वात्सल्य, नाना म्हणजेच मदतीचा हात, नाना म्हणजेच आपला माणूस, की जो कायम सोबत असतो आपलेपणाने वागवतो. नाना म्हणजेच विकास. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून नानांनी आपल्या गटाचा विविध योजनांच्या माध्यमातून विकास केलेला दिसून येतो‌ त्यामध्ये रस्ते कॉंक्रिटीकरण असेल, अंडरग्राउंड गटार असेल, समाजमंदिर असेल ,सोलर लॅम्प असतील अंगणवाड्या, व्यायामशाळा तसेच पंचायत समितीच्या माध्यमातून घरकुल योजना, जवाहर विहीर योजना, शेती अवजारे ,अपंगासाठी झेरॉक्स मशीन वाटप ,महिलांसाठी मोफत गॅस कनेक्शन, शिलाई मशीन ,मिरची कांडप यंत्र, इत्यादींच्या माध्यमातून गावात रोजगार निर्माण करून दिला व गाव सुजलाम सुफलाम करण्यामध्ये त्यांनी सिंहाचा वाटा उचलला. त्याचबरोबर पांडुरंग परिवाराच्या माध्यमातून गरजू व होतकरू मुलांना कारखान्यात कामगार म्हणून नियुक्त करून त्यांचा रोजी रोटीचा प्रश्न मार्गी लावला. आटपाडी एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून तरुणांची पात्रता पाहून त्यांना संस्थेमध्ये नोकरी दिली त्यामुळे अनेक हात नानांना आशीर्वाद देण्यासाठी कायम उंचावलेले असतात.

  राजकारणापेक्षा नाना हे माणूस म्हणून सर्वश्रेष्ठ आहेत. ज्या ही ठिकाणी गरज पडेल त्या ठिकाणी राजकारण,गट ,तट बाजूला ठेवून नाना माणूस या नात्याने त्या माणसांच्या पाठीमागे मोठ्या भावाप्रमाणे उभे असतात. हा त्यांच्यातील गुणच त्यांना कधी पराजय बघू देत नाही. नानांच्या व्यक्तिमत्त्वाचा अभ्यास केल्यानंतर संत तुकाराम महाराजांचा अभंग आठवल्या शिवाय राहत नही.  

    जे का रंजले गांजले | त्याशी म्हणेज व आपुले |

     तोचि साधू ओळखावा | देव तेथेची जाणावा ||

  ज्यांच्यात आम्ही पंढरीच्या पांडुरंगाचे रूप पाहत असतो ते आमचे दैवत आदरणीय वसंत नाना देशमुख होय.

  लेखक - प्रा.डॉ.सुभाष विठ्ठल खिलारे

     मोबाईल नं.- ९३७२४२५४१२