पंढरपूर तहसीलच्या शासकीय धान्य गोडाऊन येथून ट्रॅक्टरसह ट्रॉली गेली चोरीला.

महसुल विभागाच्या ताब्यातील वाहने चोरीला हा एक अजब प्रकार

पंढरपूर तहसीलच्या शासकीय धान्य गोडाऊन येथून ट्रॅक्टरसह ट्रॉली गेली चोरीला.

पंढरपूर तहसीलच्या शासकीय धान्य गोडाऊन येथून ट्रॅक्टरसह ट्रॉली गेली चोरीला.

महसूल विभागात उडाली खळबळ

महसुल विभागाच्या ताब्यातील वाहने चोरीला हा एक अजब प्रकार

आज्ञात चोरट्या विरुद्ध पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

पंढरपूरशुक्रवारदिनांक19जानेवारी पंढरपूर येथील शासकीय गोदाम येथून ट्रॅक्टर ट्रॉली चोरीला गेली असल्याने फिर्यादी सचिन वामन कुंभार वय वर्ष 45 धंदा नोकरी राहणार गणपती नगर टाकळी रोड पंढरपूर यांनी शासकीय धान्य गोदाम पंढरपूर येथून ट्रॅक्टर व ट्रॉली चोरीला गेल्याने अज्ञात चोरट्याची विरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

सचिन कुंभार हे गेले दोन वर्षापासून शासकीय धान्य गोदाम पंढरपूर येथे गोडाऊन व्यवस्थापक म्हणून कार्यरत आहेत .महसूल विभाग पंढरपूर यांनी अनधिकृत वाळू उत्खनन वाहतूक करणारे ट्रॅक्टर व ट्रेलर तसेच वाहने जप्त करून हे शासकीय गोदामाचे आवारात लावलेली आहेत. दिनांक ११/१ /२०२४ रोजी खरात वस्ती गुरसाळे तालुका पंढरपूर येथे अनधिकृत वाळू वाहतूक करीत असताना बिगर नंबरचा महिंद्रा कंपनीचा ६०५डी. आय मॉडेलचा ट्रॅक्टर व बिगर नंबरची डम्पिंग ट्रॉली मंडल अधिकारी पंढरपूर यांना मिळून आल्याने त्यांनी पंचनामा करून सदर ट्रॅक्टर ट्रेलर जप्त करून शासकीय धान्य गोडाऊन पंढरपूर येथे लावली होती. मी दिनांक १४/१/२०२४ रोजी सायंकाळी ६ वाजण्याची सुमारास ऑफिस बंद करून घरी जात असताना धान्य गोदाम समोर जप्त करून लावलेली वाहने पाहिली असता ती सदर ठिकाणी होती. परंतु दिनांक १५/१/२०२४ रोजी सकाळी ९.४५ वाजण्याच्या सुमारास मी शासकीय धान्य गोदाम येथे आलो असता मला दिनांक ११/१/२०२४ रोजी धान्य गोदामा वरात लावण्यात आलेला बिगर नंबरचा महिंद्रा कंपनीचा ६०५डी आय मॉडेलचा ट्रॅक्टर व ट्रॉली मिळून आली नाही. तेव्हा माझी खात्री झाली की कोणीतरी सदर ट्रॅक्टर वर ट्रॉली चोरून नेली आहे त्यानंतर मी सदर प्रकार तहसिलदार सुशील बेल्हेकर यांना फोन करून सांगून ट्रॅक्टर व ट्रॉली चोरून नेले बाबत लेखी पत्रही दिले. तशिलदार यांनी दिनांक१६/१/२०२४ रोजी मला गुन्हा दाखल करणे बाबत लेखी आदेश दिल्याने मी आज रोजी तक्रार दिली आहे.चोरीस गेलेल्या ट्रॅक्टर वर ट्रॉलीचे वर्णन खालील प्रमाणे ३लाख रुपये किमतीचा एक बिगर नंबरचा लाल रंगाचा महिंद्रा कंपनीचा ६०५ डी आय मॉडेल ट्रॅक्टर जुनी ट्रॉली अंदाजे ५० हजार रुपये किमतीचे असून भगव्या रंगाची बिगर नंबरची ट्रॉली आहे. एकूण असे ३लाख ५० हजार रुपये किमतीची ट्रॅक्टर ट्रॉली आहे.१४/१/२०२४ रोजी सायंकाळी६ वाजता ते दिनांक १५/१/२०२४ सकाळी ९.४५ वाजण्याचे दरम्यान शासकीय धान्य गोदाम पंढरपूर येथे मंडळ अधिकारी पंढरपूर यांनी जप्त करून लावलेली वरील वर्णनाची व किमतीचा ट्रॅक्टर व ट्रॉली कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेला असल्याने अज्ञात चोरट्या विरुद्ध पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.