पंढरपूर येथील बौद्धभूमीसाठी जागेसाठी समक्य क्रांती मंच उद्या पंढरपूर

बुद्धभुमीच्या प्रस्तावाच्या अंमलबजावणीसाठी अक्षम्य दुर्लक्ष

पंढरपूर येथील बौद्धभूमीसाठी जागेसाठी समक्य क्रांती मंच उद्या पंढरपूर
पंढरपूर येथील बौद्धभूमीसाठी जागेसाठी समक्य क्रांती मंच उद्या पंढरपूर

पंढरपूर येथील बौद्धभूमीसाठी जागेसाठी समक्य क्रांती मंच उद्या पंढरपूर नगर परिषदेसमोर हलगीनाद आंदोलन आमरण उपोषण

सम्यक्रांती मंच सिद्धार्थ जाधव.

पंढरपूर नगरपरिषदेने सुमारे बारा वर्षांपासून लोकशाही मार्गाने सनदशीर प्रस्तावित केलेल्या बुद्धभूमीसाठी आवश्यक असलेली जमीन देण्यास प्रस्थापित नोकरशाही टाळाटाळ करीत आहेत. अधिकाऱ्यांच्या संगनमताने कर्मचारी संघटनेच्या आडून घाई गडबडीने बुद्धभूमीसाठी आवश्यक असलेली जमीन हाडपण्यास मदत करण्याचा प्रयत्न गोपनीय पद्धतीने सुरू केलेला आहे. त्यामुळे गुरुवार दिनांक 3 ऑक्टोंबर रोजी पंढरपूर नगर परिषदेच्या समोर हलगी नाद व आमरण आंदोलन उपोषण केले जाणार असल्याची माहिती समक्य क्रांती मंचचे संस्थापक अध्यक्ष सिद्धार्थ जाधव यांनी पत्रकार परिषदेमध्ये माहिती दिली .यामध्ये उप अधिक्षक भूमी अभिलेख पंढरपूर, यांनी जे बारा वर्षात जमले नाही ते बारा महिन्यात करून दाखविण्याची कर्तबगारी केलेली आहे. हीच सचोटी बुद्धभूमीसाठी आवश्यक असलेल्या जमिनीबाबत का दाखविली नाही याची चौकशी झालीच पाहिजे. तसेच मुख्याधिकारी पंढरपूर नगरपरिषद, नगर अभियंता पंढरपूर नगरपरिषद यांनी बुद्धभुमीच्या प्रस्तावाच्या अंमलबजावणीसाठी अक्षम्य दुर्लक्ष केलेले असून ते बुद्धभुमीच्या विकासासाठी लोकप्रतिनिधींनी शासनाच्या वैशिष्टयपूर्ण योजने अंतर्गत आणलेल्या निधीबाबतही उदासीनता दाखवत आहेत. याचा आम्ही तीव्र निषेध करीत असल्याचे सांगितले.भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा झाला. परंतु पंढरपुरातील तुळशीमाळ बनविणारे व तत्सम पूजा साहित्य बनविणाऱ्या स्थानिक उत्पादकांच्या व अनुसूचित जाती जमाती, नवबौद्ध तसेच भटक्या विमुक्त जातीतील लोकांच्या हितार्थ मागणी करूनही सांस्कृतिक भवन उभारण्यासाठी पंढरपूर नगरपरिषद तथा महाराष्ट्र सरकारकडून अद्याप जागा मिळत नाही.परंतु विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीच्या कर्मचारी संघटनेला तातडीने जागा देण्याचा खटाटोप सुरू आहे हा खोडसाळ प्रकार त्वरित थांबवावा. विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीच्या कर्मचारी संघटनेला आवासासाठी जागा जरूर मिळावी. परंतु ती विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीच्या ताब्यात असलेल्या जमिनीतून देण्यात यावी. 

वरील वस्तुस्थितीकडे दुर्लक्ष करणाऱ्या जिल्हा अधिक्षक, भूमी अभिलेख सोलापूर, उप अधीक्षक, भूमी अभिलेख, पंढरपूर, मुख्याधिकारी पंढरपूर नगरपरिषद, नगर अभियंता, पंढरपूर नगरपरिषद यांचा आम्ही तीव्र निषेध करीत खालील मागण्या तातडीने मान्य करावी असे सांगितले.

पंढरपूर नगरपरिषदेने लोकशाही मार्गाने प्रस्तावित केलेल्या यमाई तलावापैकीच्या जमिनीवरील बुद्धभूमीचा सनदशीर प्रस्ताव तयार करून घेऊन शासनाने त्वरित मंजुरी द्यावी.,पंढरपूर नगरपरिषदेने लोकशाही मार्गाने सनदशीर प्रस्तावित केलेल्या बुद्धभुमिसाठी आवश्यक असलेली यमाई तलावापैकीची जमीन संगनमताने घाई गडबडीने आणि खोडसाळपणे हाडपण्यास मदत करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी . त्वरित कारवाई करावी. अन्यथा आम्ही आमच्या या न्याय्य मागण्यांसाठी पंढरपूर नगरपरिषद कार्यालय समोर गुरुवार दिनांक ०३/१०/२०२४ रोजी सकाळी ११:०० वाजल्यापासून हलगीनादासह आमरण उपोषण सुरू करीत असल्याची माहिती पत्रकार परिषदेत दिली .या वेळी सिद्धार्थ जाधव प्रशांत लोंढे, स्वप्नील गायकवाड रविंद्र शेवडे, कालिदास जाधव दीपक वाघमारे, अक्षय सोनवणे राजन गायकवाड ,विठ्ठल पवार सनी पिंगळे.