सार्वजनिक बांधकाम विभागाचे हनुमंत गायकवाडआदर्श कर्मचारी पुरस्काराचे मानकरी.

श्री संजय माळी अध्यक्ष अभियंता सार्वजनिक बांधकाम मंडळ सोलापू

सार्वजनिक बांधकाम विभागाचे हनुमंत गायकवाडआदर्श कर्मचारी पुरस्काराचे मानकरी.

सार्वजनिक बांधकाम विभागाचे हनुमंत गायकवाडआदर्श कर्मचारी पुरस्काराचे मानकरी.

सार्वजनिक बांधकाम विभाग मंडळ सोलापूर या विभागामध्ये श्री हनुमंत चांगप्पा गायकवाड हे प्रथम लिपिक म्हणून कार्यरत असताना त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केल्याने आदर्श कर्मचारी म्हणून पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत.

महाराष्ट्र शासन सार्वजनिक बांधकाम विभाग मंडळ सोलापूर यांनी आदर्श कर्मचारी पुरस्कार 2024 भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या आदर्श अभियंता कर्मचारी पुरस्कार वितरण समारंभ स्नेह मेळावा मंगळवार दिनांक 1/ 10/2024रोजी संपन्न झाला. सार्वजनिक बांधकाम विभाग मंडळ सोलापूर यांच्या आदर्श अभियंता कर्मचारी पुरस्कार समारंभ वेळी 11वाजता वृक्षरोपण व दुपारी 12/30 वाजता रक्तदान शिबिर, सायंकाळी 5 वाजता पुरस्कार वितरण व विविध गुणदर्शन व त्यानंतर रात्री आठ वाजता सुरुची भोजन असे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक श्री संजय माळी अध्यक्ष अभियंता सार्वजनिक बांधकाम मंडळ सोलापूर, मनोज ठाकरे, कार्यकारी अभियंता सां बा विभाग सोलापूर, अजय कुमार भोसले कार्यकारी अभियंता सांबा विभाग क्रमांक 2, अमित निमकर कार्यकारी अभियंता सांबा विभाग पंढरपूर, श्रीमती सुनिता पाटील कार्यकारी अभियंता सांबा विभाग अकलूज, हे असून या कार्यक्रमासाठी सोलापूर जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाचे आदर्श अभियंता कर्मचारी पुरस्कारचे मानकरी व विभागातील कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.