*परिवर्तनाच्या चळवळीत सर्वच शेतकरी संघटना अभिजीत पाटलांच्या पाठिशी* विठ्ठलच्या

विठ्ठलच्य ऊस उत्पादक शेतकर्‍यांसाठी आंदोलनाची वेळ येणार नसल्याची प्रतिक्रिया*

*परिवर्तनाच्या चळवळीत सर्वच शेतकरी संघटना अभिजीत पाटलांच्या पाठिशी*  विठ्ठलच्या

*परिवर्तनाच्या चळवळीत सर्वच शेतकरी संघटना अभिजीत पाटलांच्या पाठिशी*

विठ्ठलच्य ऊस उत्पादक शेतकर्‍यांसाठी आंदोलनाची वेळ येणार नसल्याची प्रतिक्रिया*

श्री. विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षीक निवडणुकीसाठी सध्या तालुक्यात जोरदार वारे वाहू लागले आहे. अशातच पंढरपूर तालुक्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटना, रयतक्रांती शेतकरी संघटना, प्रहार संघटना यासह रघुनाथदादा पाटील यांच्या शेतकरी संघटनेनेही अभिजीत पाटील यांच्या पॅनलला पाठिंबा दिला आहे. यामुळे परिवर्तनाच्या चळवळीत सर्वच शेतकरी संघटनांची चळवळ अभिजीत पाटील यांच्या पाठिंशी उभी राहिली आहे.

सत्ताधार्‍यांनी मागील ऊस बिलाचे पेमेंट न दिल्याने अनेकवेळा वरील संघटनांच्या वतीने आंदोलने करण्यात आली होती. ही आंदोलने ऊस उत्पादक शेतकर्‍यांच्या हितासाठी होती. तरीही या आंदोलनाचा विचार न करता सत्ताधारी संचालक मंडळाने ऊस बिले देण्यात असमर्थता दाखवली आहे. यामुळे या निवडणुकीत योग्य नेतृत्व मिळवून देण्यासाठी आम्ही वरील सर्वच शेतकरी संघटनांनी श्री विठ्ठल परिवर्तन विकास आघाडी पॅनलचे नेते अभिजीत पाटील यांना पाठिंबा दिला असल्याचे सांगितले आहे.

आमच्या या पाठिंब्याने आणि भिरडलेल्या ऊस उत्पादक शेतकर्‍यांच्या विचारातून विठ्ठलवरील परिवर्तन निश्‍चित असून अभिजीत आबा पाटील यांच्या साखर कारखानदारीतील अनुभवामुळे या शेतकर्‍यांच्या ऊस बिलाच्या मागणीसाठी आम्हाला या नंतर कधीही आंदोलने करण्याची वेळ येणार नाही. यामुळेच आम्ही अभिजीत पाटील यांना या निवडणुकीत भक्कम  साथ देण्याचा निर्णय घेतला असल्याची प्रतिक्रीया प्रहार संघटनेचे नानासाहेब इंगळे, संतोष मोरे आणि रघुनाथदादा पाटील शेतकरी संघटनेचे संभाजी पवार, पंजाबराव भोसले यांनी सांगितले आहे.

शुक्रवारी वरील शेतकरी संघटनांनी पाठिंबा दिला आहे. यावेळी प्रहार संघटनेचे सुदाम मोरे, निखिल खिलारे, गणेश कांबळे, याकुब मुलाणी, बाबुलाल मुलाणी, इब्रहाइम मुलाणी, नवशाद मुलाणी यांच्यासह प्रहार संघटनेचे पंढरपूर तालुक्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. तसेच रघुनाथदादा पाटील शेतकरी संघटनेचे विठ्ठल भोसले, पंजाबराव भोसले, शिवाजी चव्हाण, लक्ष्मण नागटिळक, नवनाथ ताड, दिपक पाटील, तुकाराम शिंदे, शिवाजी जाधव आदींसह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.