श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित

पुरस्काराबद्दल नाथ संस्थान शिष्यवर्गातून अभिनंदन

श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित

श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित.

पंढरपूर दि.७ जुलै श्रीसंत मारोती महाराज दस्तापुरकर जीवन गौरव पुरस्काराने श्री गहिनीनाथ महाराज सन्मानित श्री संत कीर्तन महर्षी मारोती महाराज दस्तापुरकर यांच्या रौप्य महोत्सवानिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर देवस्थान समितीचे सहअध्यक्ष सद्गुरु श्री गहिनीनाथ महाराज औसेकर यांना श्री संत मारोती महाराज दस्तापुरकर जीवनगौरव पुरस्कार एका विशेष समारंभात देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.

श्रीक्षेत्र पंढरपूर येथे गाथा महर्षी हरिभक्त परायण श्री रामभाऊ राऊत महाराज व ह भ प श्री अच्युत महाराज दस्तापुरकर यांच्या हस्ते शाल श्रीफळ सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन श्रीक्षेत्र पंढरपूर येथे आज सोमवार दिनांक सात जुलै रोजी हा गौरव संपन्न झाला.वारकरी संप्रदायात अलौकिक अध्यात्मिक कार्य केलेल्या महान संताच्या नावाने औसेकर महाराजांना दिलेल्या या पुरस्काराबद्दल नाथ संस्थान शिष्यवर्गातून अभिनंदन होत आहे.