सोलापूर जिल्ह्यातील लाच स्वीकारणाऱ्या तत्कालीन तलाठ्यांला पाच वर्षे सक्त मजुरी करावास शिक्षा

लाचलुचपत प्रतिबंधक अधिनियम कलम ७ अन्वये ५ वर्षे सक्त मजुरी कारावास व २००० रु. दंड

सोलापूर जिल्ह्यातील लाच स्वीकारणाऱ्या तत्कालीन तलाठ्यांला पाच वर्षे सक्त मजुरी करावास शिक्षा

लाच स्वीकारणाऱ्या तत्कालीन तलाठ्यांला पाच वर्षे सक्त मजुरी करावास शिक्षा

सोलापूर : शेतजमीन खरेदी केलेल्या ७/१२ उता-यावर नांव लावून देण्यासाठी लाच स्विकारणारे तत्कालीन तलाठी यांना ५ वर्षे सक्त मजुरी कारावास शिक्षा सुनावण्यात आली आहे.

यातील तक्रारदार यांनी मौजे लिंबी चिंचोळी तालुका दक्षिण सोलापूर जि. सोलापूर शिवारात शेतजमीन खरेदी केलेल्या ७/१२ उता-यावर नांव लावून देण्यासाठी तक्रारदार यांना रामकिसन पंडीतराव किन्हाळकर तलाठी यांनी ३,००० रुपये लाचेची मागणी केली होती. त्यावरून तक्रारदार यांनी अॅन्टी करप्शन ब्युरो, सोलापूरकडे संपर्क साधला असता अॅन्टी करप्शन ब्युरो सोलापूरकडून लाचेची सापळा लावण्यात आला होता. त्यामध्ये रामकिसन पंडीतराव किन्हाळकर, तत्कालीन तलाठी मौजे लिंबीचिंचोळी ता. द. सोलापूर जि. सोलापूर यांना लाच स्विकारल्यानंतर पकडण्यात आले होते.

त्यावरून रामकिसन पंडीतराव किन्हाळकर, तत्कालीन तलाठी मौजे लिंबीचिंचोळी ता. द. सोलापूर जि. सोलापूर यांचेविरूध्द सदर बझार पोलीस स्टेशन येथे गुरनं ३२४ / २०१७, लाचलुचपत प्रतिबंधक अधिनियम क. ७.१३ (१)(ड) सह १३ (२) प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता. सदर गुन्हयाचा तपास विश्वनाथ सिद तत्कालीन पोलीस निरीक्षक, अॅन्टी करप्शन ब्युरो, सोलापूर यांनी करून रामकिसन किन्हाळकर यांच्या विरुध्द विशेष न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले होते. सदर केसची मा. न्यायमुर्ती श्रीमती रेखा पांढरे मॅडम अति सत्र न्यायाधिश, सोलापूर यांच्या कोर्टात होवून आरोपी रामकिसन पंडितराव किन्हाळकर, यांना वरील गुन्हयात दोषी ठरवून त्यांना लाचलुचपत प्रतिबंधक अधिनियम कलम ७ अन्वये ५ वर्षे सक्त मजुरी कारावास व २००० रु. दंड तसेच कलम १३ (१) (ड) सह १३ (२) अन्वये ५ वर्षे सक्त मजुरी कारावास व २००० रु. दंड दोन्ही शिक्षा एकत्रीतपणे भोगणे अशी शिक्षा सुनावली आहे. 

सरकार तर्फे सदर खटल्यात अॅड. अल्पना कुलकर्णी तर आरोपीतर्फे अॅड. अश्विनी कुलकर्णी यांनी काम पाहिले. अॅन्टी करप्शन तर्फे कोर्ट पैरवी म्हणून सहा. पोलीस फौजदार सायबण्णा कोळी, पोलीस हवालदार बाणेवाले, पोना घुगे, पोना नरोटे यांनी काम पाहिले आहे.