कोल्हापूर परिक्षेत्रीय पोलीस कर्तव्य मेळावा 2023 मध्ये सोलापूर ग्रामीण पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी.

सुवर्ण पदक प्राप्त करून सोलापूर ग्रामीण पोलीस दलाची मान उंचावली

कोल्हापूर परिक्षेत्रीय पोलीस कर्तव्य मेळावा 2023 मध्ये सोलापूर ग्रामीण पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी.

कोल्हापूर परिक्षेत्रीय पोलीस कर्तव्य मेळावा 2023 मध्ये सोलापूर ग्रामीण पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी.

कोल्हापूर परीक्षेत्रीय कर्तव्य मेळावा 2023 हा दिनांक 19/07/2023 ते 21/07/2023 या कालावधीत पोलीस मुख्यालय पुणे ग्रामीण येथे पार पडला असून पोलीस हवालदार इकबाल शेख, पोलीस शिपाई प्रसाद मांढरे व योगेश नरळे यांनी कॉम्प्युटर अवेअरनेस या स्पर्धा प्रकारामध्ये कांस्य पदक व महीला पोलीस शिपाई क्रांती पवार यांनी पोलीस ऑब्झर्वेशन या स्पर्धा प्रकारामध्ये सुवर्ण पदक प्राप्त करून सोलापूर ग्रामीण पोलीस दलाची मान उंचावली आहे.

सदरचे कार्यक्रम मा. श्री. न्या. शाम चांडक, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश पुणे यांचे शुभ हस्ते, मा. श्री. सुनिल फुलारी (भा.पो.से.) विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर परिक्षेत्र यांचे प्रमुख उपस्थितीत कोल्हापूर परीक्षेतील पोलीस कर्तव्य मेळावा 2023 हा पोलीस मुख्यालय पुणे ग्रामीण येथील पोलीस संशोधन केंद्र, सभागृह येथे दिनांक 21/07/2023 रोजी 18:30 वा. बक्षीस वितरण व सांगता समारोह पार पडला.

सदर कार्यक्रमाकरिता पुणे ग्रामीण, कोल्हापूर, सांगली, सातारा व सोलापूर ग्रामीण जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक, अप्पर पोलीस अधीक्षक तसेच कोल्हापूर परीक्षेतील सर्व परिविक्षाधीन सहाय्यक पोलीस अधीक्षक व वरिष्ठ अधिकारी तसेच परीक्षेत्रातील स्पर्धक अधिकारी व अंमलदार उपस्थित होते.