श्रद्धेय सुधाकरपंत परिचारक यांच्या जयंतीनिमित्त विविध उपक्रम संपन्न

मोफत नेत्र तपासणी शिबिर, मोतीबिंदू निदान शिबिर व दंत तपासणी शिबिर

श्रद्धेय सुधाकरपंत परिचारक यांच्या जयंतीनिमित्त विविध उपक्रम संपन्न

श्रद्धेय सुधाकरपंत परिचारक यांच्या जयंतीनिमित्त विविध उपक्रम संपन् :- 

    पंढरपूर  लायन्स क्लब पंढरपूर व विवेक परदेशी मित्र परिवार यांच्या वतीने श्रद्धेय सुधाकरपंत परिचारक यांच्या जयंती निमित्ताने युवा नेते प्रणवजी परिचारक यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये मोफत नेत्र तपासणी शिबिर, मोतीबिंदू निदान शिबिर व दंत तपासणी शिबिर हे परदेशी फिजोथेरपी क्लिनिक , परदेशी नगर येथे संपन्न झाले. सदर प्रसंगी शिबिरात उपस्थित महिलांना कॅल्शियम वाढीचे औषधे मोफत देण्यात आली. प्रकल्प प्रमुख डॉ मृणाल गांधी, डॉ अश्विनी परदेशी, डॉ ऋजुता उत्पात यांच्या मार्गदर्शनाखाली लायन्स संस्था व परदेशी क्लिनिक यांच्या वतीने सदर औषधे देण्यात आली. सदर वर्षांमध्ये दर महिन्याला शिबीराच्या माध्यमातून जास्तीत जास्त महिला नागरिकांना कॅल्शियम वाढीचे औषध देण्याचा मानस असल्याचे लायन्स अध्यक्ष विवेक परदेशी यांनी सांगितले. लायन्स क्लब संचलित शहीद मेजर कुनाल गोसावी निवासी अंध शाळे मध्ये दंत तपासणी घेण्यात आली व विद्यार्थ्यांना लायन्स क्लब व विवेक परदेशी मित्र परिवाराच्या वतीने ट्युब ब्रश,ट्युब पेस्ट व शालेय साहित्य देण्यात आले. सदर प्रसंगी १२० नागरीक व ५० मुलांची तपासणी करण्यात आली. नेत्र तज्ञ सहाय्यक अमोल कवाळे यांनी डोळ्याची तपासणी केली तर डॉ विजय वाघ व डॉ विजयालक्ष्मी हिरवे यांनी दंत तपासणी केली. 

           सदर प्रसंगी राजीव कटेकर, मा.नगरसेविका रेणुकाताई धोडके, हेमंत कुलकर्णी, बंडोपंत सबनीस, दिपक येळे, प्रभुदयाल खंडेलवाल, माधुरी माने, सरीता गुप्ता, सतीश कुलकर्णी, नारायण उत्पात, सीमा गुप्ता, शोभा गुप्ता, रामचंद्र वाघ, रामचंद्र काळे, परमेश्वर डांगे, सुरेखाताई कुलकर्णी, राजीव गुप्ता, विजय खंडेलवाल उपस्थित होते.