प्रा. जी प सदस्य सुभाषराव माने यांचा भव्य नागरी सत्कार व विकास कामाचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला.

चेअरमन प्रशांतराव परिसरात माढयाचे आमदार बबनदादा शिंदे यांच्या हस्ते विविध कामाचे उद्घाटन

प्रा. जी प सदस्य सुभाषराव माने यांचा भव्य नागरी सत्कार व विकास कामाचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला.

प्रा. जी प सदस्य सुभाषराव माने यांचा भव्य नागरी सत्कार व विकास कामाचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला.

मंगळवार दिनांक 4 सप्टेंबर रोजी सायंकाळी 7 वाजता पंढरपूर तालुक्यातील ईश्वर वठार येथे मा आ. तथा चेअरमन प्रशांतराव परिसरात माढयाचे आमदार बबनदादा शिंदे यांच्या हस्ते विविध कामाचे उद्घाटन व लोकार्पण सोहळा करण्यात आला आहे.

 प्रा. तथा जिल्हा परिषद सदस्य सुभाषराव माने यांनी रोपळे गटातील 13 गावांसाठी विविध विकास कामासाठी अधिक निधी खेचून आणला आहे. आज पर्यंतच्या इतिहासात कोणत्याही जिल्हा परिषद सदस्यांनी एवढा मोठा निधी आणून विकास कामे केली नाहीत ते फक्त सुभाषराव माने यांनाच जमले असे वक्तव्य आ.प्रशांतराव परिचारक यांनी केले. सुभाषराव माने यांनी गट तट पक्ष न पाहता अनेक गावांना विकास कामात मोठी मदत केली आहे. याप्रसंगी माढ्याचे आमदार बबनदादा शिंदे यांनी जमलेल्या गर्दीवर लक्ष वेधून म्हणाले की सुभाषराव माने यांनी आजपर्यंत केलेल्या विकास कामाची पोहच पावती आहे. एवढे सत्काराला उत्तर देताना सुभाषराव माने म्हणाले की माझ्यासारख्या गरीब माने कुटुंब यांच्यावर स्वर्गीय आमदार श्रीमंतयोगी सुधाकर पंत परिचारक मालक यांनीच राजकारणामध्ये आमच्या कुटुंबाला आणले आणि राजकारण आणि कौटुंबिक संसार कसा करायचा त्यांनी शिकवला तसेच ईश्वर वठार येथे शाळा काढण्यासाठी मोठ्या मालकांनीच काढून दिली त्यामुळेच आज आमच्या कुटुंबाला व जनतेला चांगले दिवस त्यांच्यामुळेच आले आहेत असे वक्तव्य सुभाषराव माने यांनी व्यक्त केले.

आ. प्रशांतराव परिचारक व माढयाचे आमदार बबनदादा शिंदे यांचे मला वेळोवेळी मार्गदर्शन मिळाले व सहकार्य केले असे माने सर म्हणाले. प्रा. तथा जिल्हा परिषद सदस्य सुभाषराव माने सर यांना विकास कामाचा लोकार्पण सोहळा व नागरी सत्कार प्रसंगी वाढदिवसा निमित्त आ प्रशांतराव परिचारक म्हणाले की सुभाषराव माने यांना व त्यांच्या विद्यापत्नी यांना पुढील दीर्घायुष्य आरोग्यदायी लाभो व त्यांनी पुढेही जनतेची अशीच कामे करावित अशी श्री विठ्ठल चरणी प्रार्थना आमदार प्रशांतराव परिचारक यांनी केली.