पंढरपुरात निघाला अंगणवाडी सेविकांचा मोर्चा.

मागण्या मान्य न झाल्यास येणाऱ्या विधानसभा मतदारावर बहिष्कार टाकू

पंढरपुरात निघाला अंगणवाडी सेविकांचा मोर्चा.

पंढरपुरात निघाला अंगणवाडी सेविकांचा मोर्चा.

पंढरपूर दिनांक 11 जानेवारी ४ डिसेंबर २०२३ पासून राज्यभरात अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांनी मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी संप पुकारला आहे.

या विविध मागण्यांसाठी गुरूवार दिनांक ११ जानेवारी २०२४ रोजी पंचायत समिती पंढरपूर कार्यालयावर अंगणवाडी सेविका व मदतनीस महिलानी मोर्चा काढला.सदर मोर्चाची सुरुवात येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून झाली. पुढे स्टेशन रोड मार्गे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून मोर्चा थेट पंचायत समितीवर धडकला.अंगणवाडी सेविकांनी अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मागण्या सरकारने मान्य कराव्यात. चार डिसेंबर पासून अंगणवाडी सेविकांचा संप सुरू आहे मात्र असणारे याकडे दुर्लक्ष करून उलट अंगणवाडी सेविकांना हजर राहण्यासाठी नोटिसा दिल्या जात आहेत. या अन्याय करणाऱ्या नोटिसांची होळी करण्याचा इशारा. अंगणवाडी सेविका संघटनेने दिला आहे. यावेळी देण्यात आलेल्या निवेदनामध्ये 'मानधन नको वेतन हवे', पेन्शन व ग्रॅज्युइटी यासह विविध मागण्यांचे निवेदन पंचायत समिती कार्यालयाला देण्यात आले.

यावेळी विधानसभा निवडणुकी पर्यंत मागण्या मान्य न झाल्यास येणाऱ्या विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकू असा इशाराही अंगणवाडी सेविका मदतनीस आणि प्रमुख अध्यक्ष पदाधिकरी यांनी इशारा दिला आहे .त्याचबरोबर वेळ पडल्यास लोक प्रतिनिधी आमदार यांच्या घरासमोर हे आंदोलन केले जाईल असे यावेळी सांगितले . संघटनेच्या तालुकाध्यक्षा सुलभा कुलकर्णी, उपाध्यक्षा मंदाकिनी माने, सचिव प्रभावती कौलगे, सल्लागार सूमन राजपूत, आनंदी क्षीरसागर, आनंदी कुचेकर यांच्यासह हजारो अंगणवाडी सेविकांनी सहभाग घेतला होता.या मोर्चाचे आयोजन महाराष्ट्र राज्य अंगणवाडी, कर्मचारी संघ शाखा पंढरपूर यांच्या वतीने करण्यात आले होते.