नागरी घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत मंगळवेढा नगरपरिषदेसाठी २६ कोटी १४ लाख रुपये निधी मंजूर - आमदार समाधान आवताडे

पंढरपूर व मंगळवेढा मतदार संघाच्या कार्यक्षेत्रामध्ये रस्ते, वीज आरोग्य, शिक्षण, स्वच्छता यावर bआ. अवताडे यांचा पाठपुरावा

नागरी घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत मंगळवेढा नगरपरिषदेसाठी २६ कोटी १४ लाख रुपये निधी मंजूर - आमदार समाधान आवताडे

नागरी घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत मंगळवेढा नगरपरिषदेसाठी २६ कोटी १४ लाख रुपये निधी मंजूर - आमदार समाधान आवताडे

मंगळवेढा दिनांक 13 फेब्रुवारी महाराष्ट्र शासन नगर विकास विभाग स्वच्छ महाराष्ट्र अभियान नागरी अंतर्गत २९ नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या नागरी घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पासाठी मंगळवेढा नगरपरिषद या संस्थेसाठी २६ कोटी १४लाख रुपये निधी मंजूर झाल्याची माहिती आमदार समाधान आवताडे यांनी दिली आहे. मंगळवेढा शहरातील नागरिकांच्या मूलभूत आणि पायाभूत सोयी - सुविधांच्या पूर्ततेसाठी या निधीच्या माध्यमातून मोठी चालना मिळणार आहे. मंगळवेढा नागरी हद्दीमध्ये वास्तव्यास असणाऱ्या नागरिकांच्या घनकचरा व स्वच्छता विषयी असणाऱ्या इतर समस्या आणि अडी -अडचणी मार्गी लावण्यासाठी तसेच शहर भागातील स्वच्छता संकल्पनेस अधिकतम पद्धतीने गतिमान करण्यासाठी या निधीचा शहरवासीयांना खूप मोठा फायदा होणार आहे.

उपलब्ध निधीमार्फत शहरामध्ये गोळा होणारा घनकचरा एकत्रित करून त्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी आधुनिक पद्धतीची साधनसामुग्री खरेदी करणे, गोळा झालेल्या कचऱ्याचे विभाजन करून त्यावर प्रक्रिया करणे व पुनर्वापरासाठी त्या कचऱ्यावर विविध प्रक्रिया करणे. नियोजित प्रक्रिया करण्यासाठी कचऱ्याच्या घनतेनुसार व आकारानुसार कचरा शेड यांची उभारणी करणे. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये शहराच्या विविध भागांत पाणी प्रवाहाच्या अडचणीमुळे साठणाऱ्या पाण्यासाठी विशिष्ट पद्धतीच्या गटारांची बांधणी करून निर्मिती करणे व दूषित पाणी शहर हद्दीबाहेर जाण्यासाठी उपाययोजना करणे. पाण्याची बचत ही काळाची गरज या अभियानानुसार पावसाच्या पाणी जमिनीमध्ये जिरविण्यासाठी विशिष्ट पद्धतीचे खड्डे बांधणे. शहराच्या निरनिराळ्या भागामध्ये आशा खड्ड्यांची निर्मिती केल्याने मुबलक प्रमाणात पावसामुळे पडणारे पाणी आवश्यक ठिकाणी थांबवणे सोयीचे होईल. मंगळवेढा शहरातील नागरिकांच्या धोरणात्मक प्रगतीसाठी व सर्वांगीण विकासासाठी आमदार समाधान आवताडे ही आपल्या व्यापक कार्यशैलीतून नेहमीच प्रयत्नशील असतात.

संपूर्ण पंढरपूर व मंगळवेढा मतदार संघाच्या कार्यक्षेत्रामध्ये रस्ते, वीज आरोग्य, शिक्षण, स्वच्छता आधी बाबींवर आमदार आवताडे यांनी शासन दरबारी आपली राजकीय वजन वापरून भरीव आणि खूप मोठा निधी उपलब्ध करून दिला आहे. आमदार आवताडे यांच्या या कार्यपद्धतीमुळे मतदार संघातील अनेक प्रलंबित प्रश्न मार्गी लागण्यास खूप मोठ्या प्रमाणात प्रारंभ झाला आहे. मंगळवेढा शहर हद्दीतील नागरिकांसाठी आमदार अवताडे यांच्या माध्यमातून पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध झाल्याने शहराचा कायापालट होण्याची चक्रे आदी गतिमान होणारा असल्याचे चित्र सध्या शहरवासीयांमध्ये दिसून येत आहे. कोणत्याही प्रकारे राजकीय आकस न ठेवता सर्वसामान्य जनतेचा विकास साधला गेला पाहिजे याच आमदार आवताडे नेहमी आपली कार्यपद्धती अवलंबत असतात.

सर्वसामान्य जनतेला केंद्रस्थानी ठेवून अविरतपणे कार्य करणारे आमदार समाधान आवताडे हे अशा निधीच्या माध्यमातून जनतेच्या भौतिक सुविधांसाठी नेहमीच सजग आणि तत्पर असतात. गेली अनेक वर्षे आपला करा राजकीय उदासीनतेमुळे मंगळवेढा शहर विकासाच्या प्रवाहापासून कोसो दूर गेले होते परंतु आमदार आवताडे यांनी खेचून आणलेला एवढा भरीव निधी शहराचा कायापालट होण्यासाठी निश्चितपणे उपयोगी पडेल. आमदार आवताडे यांची ही विकासाभिमुख पद्धत शहराला प्रगतीच्या वेगळ्या उंचीवर घेऊन जाईल असा विश्वास प्रत्येक नागरिकाच्या मनात निर्माण झाला आहे.