शोएब कलाल यांनी घेतला निती आयोगाच्या मानकांचा आढावा

निती आयोगाचे आरोग्याचे उपसचिव शोएब अहमद कलाल हे सोलापूर दौऱ्यावर असून त्यांनी आज निती आयोगाच्या मानकांचा आढावा घेतला. 

शोएब कलाल यांनी घेतला निती आयोगाच्या मानकांचा आढावा

शोएब कलाल यांनी घेतला निती आयोगाच्या मानकांचा आढाव

सोलापूर,दि.15 (जिमाका): निती आयोगाचे आरोग्याचे उपसचिव शोएब अहमद कलाल हे सोलापूर दौऱ्यावर असून त्यांनी आज निती आयोगाच्या मानकांचा आढावा घेतला. 

यावेळी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, मनपा आयुक्त पि. शिवशंकर, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते उपस्थित होते. दौऱ्यामध्ये श्री. कलाल यांनी डॉ. व्ही. एम. वैद्यकीय महाविद्यालय येथे सोलापूर शहर व जिल्ह्यातील आरोग्य विभागातील विविध कार्यक्रमांचा आढावा घेतला. यामध्ये प्रामुख्याने माता व बाल आरोग्य, प्रधानमंत्री मातृवंदना योजना, प्रधानमंत्री जन आरोग्य अभियान, हेल्थ ॲन्ड वेलनेस सेंटर, असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम इ. कार्यक्रमांचा समावेश होता.

दौऱ्यात त्यांनी श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय सोलापूर व नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राची पाहणी देखील केली. दाराशा नागरी आरोग्य केंद्रातील आशा स्वयंसेविका यांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला. कोविड 19 काळात त्यांनी केलेल्या कामाचे कौतुक व अभिनंदन केले. तसेच त्यांचनी निर्माणाधिन महिला रुग्णालय व जिल्हा रुग्णालय यांच्या बांधकामाची पाहणी केली.         

यावेळी राज्य कुटुंब कल्याण कार्यालयाचे सहाय्यक संचालक डॉ. अनिरुद्ध देशपांडे, डॉ. व्ही एम वैद्यकीय महाविद्यालय अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.प्रदीप ढेले, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीकांत कुलकर्णी, मनपाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. बसवराज लोहारे, विभागीय कार्यक्रम व्यवस्थापक गणेश जगताप आदींची उपस्थिती होती.