*हेरवाड घटनेनंतर विधवा सन्मान करू नका !नीलमताई गोर्हे, मा.मुख्यमंत्री व मान्यवरांच्या नावे धमकीचा मेल .उपसभापती कार्यालयाकडून नगर पोलीस अधीक्षकांना कडक कारवाईचे निर्देश...*

राज्यात दिनांक ५ मे, २०२२ रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील हेरवाड येथे ग्राम पंचायतीने विधवा प्रथेसंदर्भात क्रांतिकारी निर्णय घेतला. या

*हेरवाड घटनेनंतर विधवा सन्मान करू नका !नीलमताई गोर्हे, मा.मुख्यमंत्री व मान्यवरांच्या नावे धमकीचा मेल .उपसभापती कार्यालयाकडून नगर पोलीस अधीक्षकांना कडक कारवाईचे निर्देश...*

*हेरवाड घटनेनंतर विधवा सन्मान करू नका !नीलमताई गोर्हे, मा.मुख्यमंत्री व मान्यवरांच्या नावे धमकीचा मेल .उपसभापती कार्यालयाकडून नगर पोलीस अधीक्षकांना कडक कारवाईचे निर्देश...*

अहमदनगर जिल्ह्यातील एका माथेफिरूने विधवा प्रथा बंदीबाबत केलेल्या ई-मेलच्या अनुषंगाने निर्देश

मुंबई दि.३० : राज्यात दिनांक ५ मे, २०२२ रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील हेरवाड येथे ग्राम पंचायतीने विधवा प्रथेसंदर्भात क्रांतिकारी निर्णय घेतला. या निर्णयाचे राज्यातील सर्व स्तरातून स्वागत झाले आहे. मी स्वतः देखील हेरवाड येथे दिनांक ११ मे, २०२२ भेट देऊन या गावाचे अभिनंदन केले आहे.

 या गावाच्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या ग्रामविकास विभागाने देखील १७ मे, २०२२ रोजी एक विशेष परिपत्रक काढून सर्व ग्रामपंचायतीनी याचे अनुकरण करावे, असे आवाहन केले आहे.

स्त्री आधार केंद्र, उपसभापती कार्यालय आणि विधवा सन्मान कायदा समिती अभियान यांच्या वतीने पुणे येथे सातारा, सांगली, कोल्हापूर, अहमदनगर, पुणे, रत्नागिरी आदि जिल्ह्यातील सामाजिक संस्था आणि सामाजिक कार्यकर्ते यांची एक 'परिवर्तन बैठक' दिनांक २७ मे, २०२२ रोजी आयोजित करण्यात आली होती.

या बैठकीची आयोजनाची बातमी प्रसारित झाल्यावर अहमदनगर जिल्ह्यातील एका माथेफिरू व्यक्तीने मुख्यमंत्री, उपसभापती कार्यालय , स्त्री आधार केंद्र तसेच अन्य मान्यवरांना हेरवाडच्या या निर्णयाचे समर्थन करणारे कार्यक्रम न घेण्याबाबत एक मेल दिन.२५ मे, २०२२ पाठविला आहे. सदर निवेदनात पत्रलेखकाने त्याच्या स्व:त:च्या आईला कोपर्डी अथवा कोठेवाडी येथे नेऊन बलात्काराची धमकी दिली आहे. 

 *विधान परिषद, उपसभापती कार्यालयाने या विषयाची गंभीर दखल घेतली असून याबाबत अहमदनगरचे पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्याशी दूरध्वनीवरून दिनांक २७ मे, २०२२ रोजी बोलून याची प्रत त्यांच्याकडे दिली असून, सदर व्यक्तीवर कडक कारवाई करण्याची सूचना केली आहे.* त्याचबरोबर शेवगावचे पोलीस उपअधीक्षक श्री मुंडे यांनी याबाबत सदरील व्यक्ती मनोरुग्ण असून यांनी यापूर्वी असे समाजात विकृत पद्धतीचे संदेश देणारे काम करत असतो. 

दि.२५ मे २०२२ रोजी केलेला संदेश अतिशय गंभीर असून याबाबत कडक कारवाई लवकरच करण्यात येईल असे सांगितले. 

याबाबत सदर व्यक्तीला ताब्यात घेऊन योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन पोलीस अधीक्षकांनी दिले आहे. *याबाबत पोलिसांकडे लेखी तक्रार दखल करून अशा विकृत मनोवृत्तीच्या लोकांना वेळीच रोखण्याबाबत योग्य ती कारवाई करण्याबाबत विनंती करण्यात येणार आहे, अशी माहिती विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिली आहे.

 यावर राज्याचे गृहराज्यमंत्री ना. श्री. शंभूराजे देसाई यांनी तातडीने याबाबत डॉ. नीलम गोऱ्हे यांना दूरध्वनी केला असून या प्रकरणाची तातडीने चौकशी केली जाईल असे सांगितले आहे. याबाबत डॉ. गोऱ्हे यांनी समाधान व्यक्त केले आहे.