पंढरपूर आरपीआय शहराध्यक्ष एड.  कीर्तीपाल सर्वगोड यांच्यासह 7 जणांवर गुन्हा दाखल.

पंढरपूर आरपीआय शहराध्यक्ष एड.  कीर्तीपाल सर्वगोड यांच्यासह 7 जणांवर गुन्हा दाखल.

पंढरपूर आरपीआय शहराध्यक्ष एड.   कीर्तीपाल सर्वगोड यांच्यासह 7 जणांवर गुन्हा दाखल.

पंढरपूर आरपीआय शहराध्यक्ष एड.

 कीर्तीपाल सर्वगोड यांच्यासह 7 जणांवर गुन्हा दाखल.

पंढरपूर तालुक्यातील वाडीकुरोली येथे अर्धा एकर जमीन दत्तात्रय कसबे मोशी पुणे यांच्याकडून विसार पावती करून घेतली आहे तुमचा काय संबंध म्हणत एकमेकांमध्ये वादविवाद होऊन आरपीआय अध्यक्ष तथा एड. कीर्तीपाल सर्वगोड व त्याच्या सोबत असणाऱ्या पाच ते सहा जणांनी पंजाब सदाशिव सोनवले व त्यांचे कुटुंबीयांना मारहाण केली असल्याने पंढरपूर आरपीआय अध्यक्ष एड. कीर्तीपाल सर्वगोड आणि सोबत असणाऱ्या सहा जणांवर पंढरपूर तालुका ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी पंजाब सदाशिव सोनवले वय 66 वर्ष धंदा शेती रा.वाडीकरोली ता. पंढरपूर पंजाब सोनवले हे त्यांची पत्नी कांताबाई मुलगा दीपक सून पूजा नातू संस्कार नाथ संस्कृती असे एकत्रित कुटुंबासह राहत असून कुटुंबाची उपजीविका त्यांच्या असणाऱ्या चार एकर जमीनिवर आहे . माझ्या घराशेजारील माझा भाऊ बबन सदाशिव सोनवले यांची शेत जमीन गट क्रमांक ७७/१ मध्ये 81 गुंठे शेत जमीन असून त्यापैकी वीस गुंठे क्षेत्र भाऊ बबन यांनी सन 2017 मध्ये दत्तात्रेय ज्ञानेश्वर कसबे रा. मोशी पुणे यांना विकली होती परंतु सदर शेत जमिनीचा ताबा आमच्याकडे होता. सुमारे एक महिन्यापूर्वी कीर्तीपाल सुनील सर्वगोड रा. पंढरपूर हा शेतामध्ये आला होता त्यावेळी शेतात उसाचे पीक होते कीर्तीपाल यांनी मला दत्तात्रय कसबे यांचे कडून शेत जमीन गट क्र.७७/१ मधील अर्धा एकर शेती विसार पावती करून घेतली आहे शेतातील ऊस मी माझे नावावर कारखान्याला घालविणार असे म्हणटलेवर मी त्यास आम्ही शेती कासत आहे तुझा काय संबंध नाही असे म्हणल्यावर तो निघून गेला होता.

रविवार दिनांक 5 फेब्रुवारी 2023 रोजी २/१५ वाजण्याच्या सुमारास मुलगा दीपक हा उसाचे वाडे आणण्यासाठी गेला होता मी घरी होतो त्यावेळी माझे ओळखीचे कीर्तीपाल सर्वगोड अरविंद कांबळे पिंटू रणपिसे योगेश रणदिवे नागेश रणदिवे आकाश सर्वगोड, उमेश सर्वगोड त्यांचे सोबत चार ते पाच जण कीर्तीपाल यांचे चार चाकी वाहन एम एच 13 डी एम 14 14 व पाटी मागील काचेवर सरकार असलेले स्कार्पिओ गाडी मधून आले त्यानंतर ते सर्वजण गट क्र.७७/१ मधील शेत जमीन मोजणी करू लागले दुपारी तीन वाजण्याची सुमारास मी घरासमोर बसलेलो असताना माझा पुतण्या गणेश पंची सोनवले हा माझ्या जवळ आला व मला हे कोण लोक आहेत जमीन कशाला मोजत आहेत असे म्हणाला त्यावेळी मी त्याला ते कायदेशीर मोजणी करत आहेत काय बघू पुढचे पुढे असे म्हणलो असता कीर्तीपाल सर्वगोड हा आमच्याकडे शिवीगाळ करीत आला व तुझा काय संबंध आहे असे म्हणून पुतण्या गणेश यास चापट मारली त्यावेळी मी त्यास तू कसला वकील येथे येऊन मारहाण करणारायला लागला आहे. असे म्हणालो त्यावेळी आमच्यामध्ये बाचाबाची झाली त्यावेळी कीर्तीपाल सर्वगोड सोबत असणारे सर्वजण आमच्या घरासमोर येऊन आम्हाला सर्वांना शिवीगाळ व दमदाटी करू लागले. तेवढ्यात माझा मुलगा दीपक हा तेथे आला.त्यावेळी कीर्तीपाल सर्वगोड यांनी याच्या अंगात लय मस्ती आहे म्हणत त्याची मोटरसायकल ढकलून दिली मुलगा दीपक खाली पडल्यानंतर त्याच्यासोबत असणारे अरविंद कांबळे त्याच्यासोबत दोघे तिघेजण आलेले त्यांनी हाताने मारहाण सुरू केली. माझी पत्नी कांताबाई सोडवण्यासाठी गेली असता कीर्तीपाल यांनी तेथेच पडलेली काठी घेऊन पत्नीच्या उजव्या हाताच्या पोटरीवर काठी मारली. पुतण्या गणेश हा भांडणाची शूटिंग करत असताना अरविंद कांबळे यांनी त्याच्या हातातील सॅमसंग कंपनीचा मोबाईल व खिशातील १२०० रुपये हिसकावून घेतले. त्यानंतर कीर्तीपाल सर्वगोड व त्याच्यासोबत आलेल्या लोकांनी मला व माझ्या पत्नीला मुलगा दीपक व पुतण्या गणेश याला हाताने मारहाण करून वाईट व शिवीगाळ करून दमदाटी केली आहे. त्यावेळी कीर्तीपाल सर्वगोड यांनी मी वकील आहे तुम्हाला बघतोच आता तुम्ही वाचला आहात अशी दमदाटी करून तेथून हे सर्वजण निघून गेले घडल्या घटने प्रकरणी मी तालुका ग्रामीण पोलीस ठाणे मध्ये कीर्तीपाल सर्वगोड अरविंद कांबळे पिंटू रणपिसे योगेश रणदिवे आकाश सर्वगोड उमेश सर्वगोड. नागेश रणदिवे अशा सहा ते सात लोकांवर भावी द कलम 324,323,327,143,147,149,504,506 पंढरपूर तालुका ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.