भाई नितीन काळे यांचा जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण अधिकाऱ्यांना दणका

मराठी माध्यम प्राथमिक शिक्षक संवर्ग पदाचे बिंदू नामावली

भाई नितीन काळे यांचा जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण अधिकाऱ्यांना दणका

भाई नितीन काळे यांचा जिल्हा परिषद शिक्षण अधिकारी यांना दणका

मागासवर्गीय शिक्षक शिक्षकावरील होणारा अन्याय थांबणार

पंढरपूर बुधवार दि.7 फेब्रुवारी भाई नितीन काळे यांनी उपोषणाचे पत्र देताच प्राथमिक शिक्षणाधिकारी यांनी दिले लेखी आश्वासन ... भारतीय जनता पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष भ वि आघाडी भाई नितीन काळे यांनी सोलापूर जिल्हा परिषदेतील मराठी माध्यमाच्या प्राथमिक शिक्षक संवर्ग पदाच्या बिंदुनामावलीत मागासवर्गीय कर्मचारी यांच्यावर होणाऱ्या अन्यायाविरोधात एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करणेबाबत इशारा दिला होता* याचीच दखल प्राथमिक शिक्षणाधिकारी श्री जावीर साहेब यांनी दखल घेऊन सोलापुर जिल्हा परिषदेतील मराठी माध्यमाच्या प्राथमिक शिक्षक संवर्ग बिंदू नामावलीच्या काम सुरू आहे. सदरचे काम लवकरात लवकर पुर्ण करण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे. सदरचे बिंदू नामावलीच्या पुर्ण झाल्यानंतर मागासवर्गीय कक्ष पुणे विभाग पुणे यांचेकडून तपासणी करून घेण्यापूर्वी सदर बिंदू नामावलीचे आपणास अवगत करूनच तपासणीसाठी सादर करण्यात येईल असे ठोस लेखी आश्वासन देण्यात आले.. गेल्या अनेक वर्षांपासून गुणवत्तेनुसार खुल्या वर्गातून निवड झालेल्या व निवड यादी मध्ये खुल्या प्रवर्गावर दर्शवलेल्या मागासवर्गीय शिक्षकांना खुल्या प्रवर्गातच दर्शवणे बंधनकारक असताना त्यांना जाणीवपूर्वक आरक्षित बिंदूवर दर्शवल्याचे दिसून येते.उदा 1991.1993 इ निवड याद्या... बिंदू नामावली तयार करत असताना निवड प्रवर्ग ठरविण्यासाठी केवळ निवडयादी व ज्या शिक्षकांच्या मूळ आदेशावर निवड प्रवर्गाचा उल्लेख आहे असे आदेशच पुरावे म्हणून ग्राह्य धरावे कोणत्याही परिस्थितीत सेवा पुस्तकातील जातीच्या नोंदीवरून निवड प्रवर्ग ठरवू नये..अशा अनेक मुद्यांच्या निवेदनाचे पत्र भाई नितीन काळे यांनी व एक दिवसीय लाक्षणिक उपोषणाचे पत्र देताच प्राथमिक शिक्षणाधिकारी यांनी लेखी आश्वासन दिले आहे.यामुळे सर्व मागासवर्गीय शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.. भविष्यात देखील मागासवर्गीय कर्मचारी यांच्यावर होणाऱ्या अन्यायाविरोधात मोठा लढा उभा करणार आहे असेही नितीन काळे यांनी पत्र कारांशी बोलताना सांगितले.. जर मागासवर्गीय कर्मचारी यांच्यावर अन्याय झाला तर कदापी सहन करणार नाही व मागासवर्गीयांच्या अनेक वर्षांपासून मागासवर्गीय यांच्या जागा हडप करण्याचे काम प्रशासनाने राजकीय दबावापोटी जाणून बुजून केलेले आहे यापुढे कदापिही असे होऊ देणार नाही असेही भाई नितीन काळे यांनी सांगितले.. यावेळी उपस्थित राष्ट्रीय रोस्टर हक्क चळवळीचे संस्थापक अध्यक्ष संदीप फणसे प्राध्यापक सुदर्शन मसुरे ॲड दत्तात्रय खडतरे व अनेक शिक्षक बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते...